Rashid Khan : राशिद खानवर कोसळला दुखा:चा डोंगर, भावाच्या निधनानंतरही खेळला सामना, पाकिस्तानी खेळाडूनी दिला धीर

Rashid Khan’s Brother Passes Away : अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानचा मोठा भाऊ हाजी अब्दुल हलीम याचे या आठवड्यात निधन झाले. तथापि, हा क्रिकेटपटू पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीसोबतच्या तिरंगी टी-20 मालिकेत संघाचा भाग आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर शाहीन आफ्रिदीसह पाकिस्तान संघाने राशिदला भेटून त्याचे सांत्वन केले.
संपूर्ण पाकिस्तानी संघाने राशिदच्या दिवंगत भावासाठी श्रद्धांजली वाहिली, ज्याचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शुक्रवारी सुरू झालेल्या तिरंगी मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यानंतरचा आहे. राशिद खानचे मोठे भाऊ हाजी अब्दुल हलीम शिनवारी यांच्या दुःखद निधनानंतर क्रिकेट जगताने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या तिरंगी मालिकेत अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि यजमान यूएई या तीन संघांचा समावेश आहे.
Pakistan team offers condolences and prayers on the death of Rashid Khan’s elder brother. #PakistanCricket #RashidKhan pic.twitter.com/gxwvXyYdnG
— Ahtasham Riaz (@ahtashamriaz22) August 29, 2025
तिरंगी टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानच्या संघाने राशिद खानच्या मोठ्या भावासाठी श्रद्धांजली वाहिली. राशिदच्या आयुष्यातील एक मजबूत आधारस्तंभ असलेले हाजी अब्दुल हलीम यांच्या निधनावर त्याच्या माजी आणि सध्याच्या संघातील खेळाडूंनी शोक व्यक्त केला. सलामीवीर इब्राहिम झद्रानसह अनेकांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.
तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाला पाकिस्तानकडून 39 धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने कर्णधार सलमान आगाच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर 7 बाद 182 धावांचा डोंगर उभा केला. मोहम्मद नवाझ याने 21, तर फखर झमानने 20 धावांची खेळी केली.
हेही वाचा – Nicholas Pooran : निकोलस पूरनने रचला इतिहास! असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज
183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ हारिस रौफच्या भेदक गोलंदाजीसमोर 19.5 षटकांत 143 धावांवर सर्वबाद झाला. रौफने 3.5 षटकांत 31 धावांत 4 विकेट्स घेतल्या, तर शाहीन आफ्रिदी, मोहम्मद नवाझ आणि सुफियान मुकीम यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.





