Salman Nizar Batting : सलमान निझारचा रुद्रावतार! KCL मध्ये शेवटच्या १२ चेंडूंत ठोकले ११ गगनचुंबी षटकार, पाहा VIDEO

Salman Nizar Batting Video Viral in KCL 2025 : केरल क्रिकेट लीग (KCL) 2025 मधील एका सामन्यात कालिकट ग्लोबस्टार्सच्या सलमान निझारने अशी तुफानी फलंदाजी केली की, प्रेक्षक आणि गोलंदाज दोघेही थक्क झाले. अदानी तिरुवनंतपुरम रॉयल्स आणि कालिकट ग्लोबस्टार्स यांच्यात झालेल्या या सामन्यात सलमानने अवघ्या 12 चेंडूत 11 षटकार ठोकत 71 धावांची बरसात केली. शेवटच्या दोन षटकांत त्याने गोलंदाजांची धुलाई करत सामन्याचा रंगच बदलून टाकला.
आधी 18 षटकांत 115 धावा, मग सलमानचा धमाका!
प्रथम फलंदाजी करणाऱ्या कालिकट ग्लोबस्टार्सने 18 षटकांत 6 बाद 115 धावा केल्या होत्या. यावेळी पल्लम मुहम्मद 2 धावांवर, तर सलमान निझार 17 धावांवर खेळत होता. पण, 19व्या षटकात सलमानने गीयर बदलला आणि तिरुवनंतपुरमचा वेगवान गोलंदाज बासिल थम्पीवर हल्ला चढवला. या षटकात त्याने सलग 5 षटकार ठोकत 31 धावा कुटल्या आणि सामन्याचा माहोल पालटला. शेवटच्या चेंडूवर एक धाव घेऊन त्याने स्ट्राइकही आपल्याकडे राखली.
20व्या षटकात सलमानचा कहर –
One man. One over. Five rockets launched into orbit. 🚀
Salman Nizar just turned the 19th into a massacre!#KCLSeason2 #KCL2025 pic.twitter.com/up2rGcTdqU— Kerala Cricket League (@KCL_t20) August 30, 2025
यानंतर पुढील 20वे षटक गोलंदाज अभिजीत प्रवीण व्हीने टाकले, पण सलमानने त्याच्यावर दया दाखवली नाही. पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत त्याने सुरुवात केली. यानंतर एक वाइड आणि नो-बॉलचा फायदा घेत सलमानने पुढील पाच चेंडूंवर सलग 6 षटकार ठोकले. या षटकातून तब्बल 40 धावा आल्या. सलमानच्या या तुफानी खेळीच्या जोरावर कालिकट ग्लोबस्टार्सने 20 षटकांत 6 बाद 186 धावांचा डोंगर उभा केला.
हेही वाचा – Nicholas Pooran : निकोलस पूरनने रचला इतिहास! असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज
26 चेंडूत कुटल्या तब्बल नाबाद ८६ धावा –
Salman Nizar after 18 overs – 17*(13)
Salman Nizar after 20 overs – 86*(26)
ONE OF THE MOST MAD INNINGS EVER – 11 SIXES IN THE LAST 12 BALLS💀🔥#salmannizar pic.twitter.com/mpARYJ64Aj
— Hemant Sharma (@delightedhemant) August 30, 2025
सलमान निझारने केवळ 26 चेंडूत नाबाद 86 धावांची खेळी केली, ज्यात 12 षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, त्याच्या खेळीत एकही चौकार नव्हता. या धडाकेबाज खेळीने सलमानने टी-20 क्रिकेटमध्ये एका फलंदाजाला अवघ्या काही चेंडूंमध्येच सामन्याचा माहोल कसा बदलता येतो, हे दाखवून दिले. या विस्फोटक खेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेवटच्या दोन षटकांत 11 षटकार पाहिल्यानंतर क्रिकेटप्रेमी सलमानच्या फलंदाजीचे कौतुक करताना थकत नाहीत.





