Rashid Khan : राशिद खानचा टी-२० क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विक्रम! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज

राशिद खानने रचला इतिहास –
ओव्हल इन्व्हिन्सिबल्सकडून खेळताना राशिदने लंडन स्पिरिट्सविरुद्धच्या सामन्यात 20 चेंडू टाकले. यात त्याने केवळ 11 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, त्याने 20 पैकी 15 चेंडू डॉट टाकले.राशिद खानने टी-20 क्रिकेटमध्ये एक नवा विक्रम स्थापित केला आहे. आतापर्यंत खेळलेल्या 482 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 651 विकेट्स घेतल्या आहेत.
He’s come back fresh. Takes his first victim only in the third ball. At the end finished with 3/11 in 20 balls with 15 dots. Add 3 catches apart from his spell. Looks like the brief break after IPL has sorted his form. #TheHundred #RashidKhan #RashIsBack pic.twitter.com/FzD2NW7ihA
— Cricket Afghanistan (@AFG_Sports) August 5, 2025
विशेष म्हणजे राशिद खानने 4 वेळा एका सामन्यात 5 विकेट्स आणि 17 वेळा एका डावात 4 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. ‘द हंड्रेड’ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात त्याने हा ऐतिहासिक टप्पा गाठला. लंडन स्पिरिट्सविरुद्ध त्याच्या फिरकी गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना नाचवले.
हेही वाचा – Sachin Tendulkar : ‘तो फक्त एक योगायोग…!’, बुमराहवर टीका करणाऱ्यांना सचिनचे सडेतोड उत्तर
ओव्हल इन्व्हिन्सिबल्सला मिळवून दिला विजय
🚨 HISTORY MADE BY RASHID KHAN 🚨
•First Bowler EVER to take 650 T20 Wickets 🔥
•The Spin Wizard continues to rewrite the record books! 🧙♂️🏏#RashidKhan #T20GOAT #CricketHistory #RecordBreaker #AfghanistanCricket pic.twitter.com/rtQwaGhW2G— GSMS Media (@GsmsMedia) August 6, 2025
राशिदच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर ओव्हल इन्व्हिन्सिबल्सने लंडन स्पिरिट्सवर 6 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना लंडन स्पिरिट्सचा संघ 80 धावांतच गारद झाला. राशिदने 3 विकेट्स घेतले, तर सॅम करननेही 18 धावांत 3 विकेट्स घेत त्याला उत्तम साथ दिली.
हेही वाचा – Fox Interrupt Match : लॉर्ड्सवर घडली अनपेक्षित घटना; कोल्ह्यामुळे थांबवावा लागला सामना, VIDEO होतोय व्हायरल
प्रत्युत्तरात 81 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओव्हलने 69 चेंडूत 4 गडी गमावून विजय मिळवला. विल जॅक्सने 24 धावांची खेळी केली, तर सॅम करनने नाबाद 14 धावा करत विजयात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यातील राशिद खानच्या या ऐतिहासिक कामगिरीने त्याने पुन्हा एकदा आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली आहे.





