अभिनेत्री रश्मीने मिस्ट्री मॅनसोबतचा केला रोमँटिक व्हिडिओ शेअर

Rashmi Desai । ‘उत्तरन’ या टीव्ही शोमधून चाहत्यांच्या मनात घर केलेली अभिनेत्री रश्मी देसाईला आज ओळखीची गरज नाही. रश्मीने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट शोमध्ये काम केले आहे. ‘बिग बॉस 13’ या रिॲलिटी शोमधून रश्मीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये तिचे सिद्धार्थ शुक्लासोबतचे भांडण आणि अरहान खानसोबतचे अफेअर खूप चर्चेत आले होते. रश्मी तिच्या लव्ह लाईफमुळे प्रकाशझोतात येण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी याआधीही या अभिनेत्रीचे वैवाहिक आयुष्य खूप वादग्रस्त ठरले होते.
रश्मीच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाचा प्रवेश झाला आहे. आजकाल रश्मी देसाई कोणत्याही टीव्ही मालिकेत दिसत नसली तरी अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ‘उत्तरन’ फेम अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्यही बरेच वादात सापडले आहे. एकेकाळी रश्मी देसाईने तिचा माजी प्रियकर आणि पती नंदिश संधूसोबतच्या नात्यामुळे खूप चर्चेत राहिली होती.
View this post on Instagram
पण अलीकडेच अभिनेत्री रश्मी देसाईने असा एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारा मिस्ट्री मॅन कोण आहे, असा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. या व्हिडिओमध्ये रश्मी कुणासोबत रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्रीसोबत दिसणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून कोरिओग्राफर सुभ्रनिल पॉल आहे. रश्मी आणि सुभ्रानील पॉल फक्त चांगले मित्र आहेत आणि दोघेही या व्हिडिओमध्ये डान्स करत आहेत.
Rashmi Desai । अभिनेत्रीने शेअर केला रोमँटिक व्हिडिओ
रश्मी देसाईचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली की अभिनेत्री या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे की आणखी काही… पण रश्मी आणि सुभ्रानील खूप चांगले मित्र आहेत, यापेक्षा जास्त काही नाही. तर काही चाहते आजही रश्मी देसाई सिंगल असल्याचे म्हणत आहे.





