शॅाकिंग! शेफाली जरीवालाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; कुटुंबावर आघात, सिनेविश्वातील मित्रपरिवाराला जबरदस्त धक्का

Shefali Jariwala passed away : एक दुःखद बातमी समोर आली आहे. कांटा लगा गाणं आणि बिग बॅास १३ साठी प्रसिद्ध असलेल्या शेफाली जरीवाला हिचे काल २७ जून रोजी हृदयविकाराच्या झटकाने निधन झाले आहे. तिच्या निधनाची बातमी समजताच तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मित्रपरिवाला मोठा धक्का बसला आहे.
२७ जून रोजी रात्री शेफालीला अंधेरीतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण आयसीयूमध्ये नेण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला. तिच्या निधनाची बातमी तिच्या कुटुंबीयांना समजात ते देखील रुग्णालयात पोहचले.
तिच्या आईचे आणि कुटुंबातील सदस्यांचे हृदयद्रावक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कमी वयात मुलीच्या निधनाच्या वृत्ताने तिच्या आईवर मोठा आघात झाला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी पुढील तपासासाठी शेफाली जरीवालाच्या घरी पोहचले.
View this post on Instagram
शेफाली जरीवालीच्या अचानक निधनाच्या बातमीने कलाविश्वातील तिच्या मित्रपरिवाराला जबरदस्त धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर आपले दुःख आणि शोक व्यक्त केला आहे. “मला खूप धक्का बसला आहे, आणि मनापासून खूप दुःख झाले आहे… आमची लाडकी स्टार आणि माझी सर्वात जवळची मैत्रीण @shefalijariwala आम्हाला सोडून गेली आहे. अजूनही विश्वास बसत नाहीये. तुझे हसू आणि उत्साह नेहमीच लक्षात राहाल. ओम शांती.” अशी पोस्ट मिका सिंगने केली आहे.
काही दिवसांपूर्वी शेफालीने तिच्या इंन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. ती तिची शेवटची पोस्ट ठरली. तिने या स्टोरीत तिचा ग्लॅमरस फोटोशूटचा फोटो शेअर केला आहे. बेबी ब्लिंग इट ऑन बेबी, असे कॅप्शन तिने फोटो खाली दिले होते. तिच्या या शेवटच्या फोटोवर चाहते तिला श्रद्धांजली वाहत आहेत.
हेही वाचा : हिंदी सक्तीचा निर्णय बिनडोकपणाचा; माजी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची टीका





