Malvika Raaj : ‘कभी खुशी कभी गम’मधली ‘लहान पू’ आई बनली ! मालविका राजच्या घरी किलबिल

Malvika Raaj : सुपरहिट चित्रपट ‘कभी खुशी कभी गम’ मध्ये करिना कपूरच्या लहानपणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मालविका राज आता खरीखुरी आई बनली आहे. 23 ऑगस्ट रोजी तिने मुलीला जन्म दिला असून ही आनंदवार्ता तिने आणि पती प्रणव बग्गा यांनी सोशल मीडियावर शेअर केली.
रविवारी संध्याकाळी या दोघांनी इंस्टाग्रामवर एक गोड पोस्ट टाकली. गुलाबी रंगाचे बलून आणि “पिंक बो, नन्हे पाय आणि भरपूर प्रेम” असा मजकूर असलेले मोशन ग्राफिक त्यांनी शेअर केले. कॅप्शनमध्ये लिहिले होते, “आमच्या हृदयातून आमच्या मिठीत, आमची लेक आली आहे.” हे पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव
ही गोड बातमी समजताच अनेक सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री प्रज्ञा जायसवालने लिहिले, “काँग्रॅट्स गाईज”, तर गायिका शर्ली सेठियाने देखील हार्दिक शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनी कमेंटमध्ये “बेबी डॉलच्या आगमनाबद्दल अभिनंदन” असे लिहून आनंद व्यक्त केला.
मालविका, प्रणव यांचे नाते
मालविका राजने 2023 मध्ये प्रणव बग्गाशी साखरपुडा केला होता. जवळपास १० वर्षे डेट केल्यानंतर, या दोघांनी नोव्हेंबर 2023 मध्ये गोव्यात थाटामाटात लग्न केले. लग्नाच्या सुंदर फोटो-व्हिडिओंना त्यावेळी चाहत्यांनी मोठी दाद दिली होती.
फॅन्ससाठी खास क्षण
‘कभी खुशी कभी गम’मध्ये लहान पूच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री आज आई बनल्याने चाहत्यांसाठीही तो खास क्षण ठरला आहे. फॅन्स म्हणतायत, “चित्रपटात करिनाची लहान पू होतीस, पण आता खरीखुरी आई बनली आहेस.”





