कोल्हापुरात युवतीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन बलात्कार; पोलीस कॉन्स्टेबलवर गुन्हा
Updated On:

कोल्हापूर (प्रतिनिधी) – सोशल मीडियाव्दारे ओळखीचा गैरफायदा घेऊन युवतीवर सतत चार वर्षे बलात्कार केल्याचा प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. त्या युवतीस गर्भपात करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिस दलातील एका पोलिस कॉन्स्टेबल विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात मंगळवार (ता.१६) गुन्हा दाखल झाला आहे.
निलेश नामदेव पडवळ (वय २८) राहणार पडवळवाडी (ता.करवीर) असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.





