”माझा हनिमून आधीच झाला असल्याने…”; रावसाहेब दानवेंची त्यांच्या स्टाईलमध्ये ‘जनआशीर्वाद’ यात्रेत टोलेबाजी

जालना – देशभरात भाजपाकडून जनआशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. मात्र जालन्यातील जन आशीर्वाद यात्रा चर्चेत येताना दिसून येत आहे. जालन्यातील भागवत कराडांच्या जन आशीर्वाद यात्रेत रावसाहेब दानवे यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे.
रावसाहेब दानवे म्हणाले की, भागवत कराड मंत्रीमंडळात नवीन चेहरा असल्याने त्यांचा मांडव परतण्याचा कार्यक्रम सुरू आहे, मी केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा मंत्री झालो, माझा हनिमून आधीच झाला असल्याने मला शपथ घेण्याची गरज पडली नाही. असे दानवे स्टाईलमध्ये त्यांनी जनआर्शीवाद यात्रेदरम्यान जोरदा भाष्य केले आहे.
लोकांनी सातत्याने ३५ वर्ष निवडून दिले नसतं तर माझ्या गावातल्या मारोतीच्या पारावर हरिपाठ म्हणत बसलो असतो, माझं मंत्रीपद जाणार असल्याच्या बातम्या माध्यमातून आल्यानंतर अनेकांना गुदगुल्या झाल्या. अशी टिका त्यांनी विरोधकांवर केली आहे.





