Ranveer Singh : धुरंधर 2 नंतर रणवीरचा मोठा धमाका! 300 कोटी बजेट असलेल्या सिनेमाविषयी मोठी अपडेट
Ranveer Singh : सगळे ठरल्याप्रमाणे झाल्यास या वर्षाच्या शेवटी किंवा २०२७ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित केला जाऊ शकतो.

Ranveer Singh : ‘धुरंधर २’च्या अभूतपूर्व यशानंतर अभिनेता रणवीर सिंह आता त्याच्या पुढील महत्त्वाकांक्षी सिनेमासाठी सज्ज झाला आहे. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ने देशांतर्गत १,१०० कोटी रुपयांहून अधिकचे बॅाक्स अॅाफिस कलेक्शन गोळा केले. अनेक सिनेमांचा विक्रम या सिनेमाने मोडीत काढला. आता रणवीरच्या आगामी सिनेमाचे नाव ‘प्रलय’ असून या सिनेमाविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
कुटुंबासोबत काही दिवसांचा वेळ घालवल्यानंतर रणवीर पुढील महिन्यापासून ‘प्रलय’च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ‘व्हरायटी’च्या वृत्तानुसार, या सिनेमाचे चित्रीकरण पुढील महिन्यात सुरू होऊन दिवाळीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सगळे ठरल्याप्रमाणे झाल्यास या वर्षाच्या शेवटी किंवा २०२७ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित केला जाऊ शकतो. (Ranveer Singh)
‘प्रलय’ हा झोम्बी आधारित सिनेमा असून, बॅालिवूडमध्ये हा विषय फारसा हाताळला गेलेला नाही. याआधी ‘गो गोवा गॉन’सारखे मोजकेच सिनेमे या विषयावर प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे रणवीरच्या आगामी प्रलय सिनेमातील दमदार अभिनय आणि सिनेमाचा वेगळा विषय प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्यात यशस्वी ठरू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Ranveer Singh)
दरम्यान, ‘धुरंधर २’च्या यशानंतर रणवीरसमोर प्रभासच्या कारकिर्दीतील उदाहरणही चर्चेत आहेत. ‘बाहुबली २’ने १ हजार कोटींचा टप्पा गाठल्यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘साहो’कडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, जवळपास ३५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने अपेक्षित यश मिळवले नाही आणि बॉक्स ऑफिसवर केवळ ३१० कोटी रुपयांची कमाई केली.
तब्बल ३०० कोटींचे बजेट (Ranveer Singh)
आता रणवीर सिंहचा ‘प्रलय’ हा तब्बल ३०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार होत असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाने ५०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली, तर रणवीर सलग ब्लॉकबस्टर देणाऱ्या मोजक्या अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवू शकतो. त्यामुळे रणवीर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २०२३ मध्ये शाहरुख खानने ‘पठाण’ आणि ‘जवान’च्या माध्यमातून सलग विक्रमी यश मिळवले होते. त्यामुळे ‘प्रलय’ रणवीरसाठी आणखी एका मोठ्या यशाची नांदी ठरणार का, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.
हेही वाचा : Amol Mitkari : “सचिदानंद बाबा कुणाच्या जिवावर नोटीस पाठवतोय…”; सुनेत्रा पवारांना चॅलेंज देताच मिटकरी संतापले






