रणवीर सिंग साऊथ सिनेमा ‘राक्षस’मधून बाहेर!

Ranveer Singh Left South Film ‘Rakshas’| अभिनेता रणवीर सिंग अभिनयासह त्याच्या हटके लुकमुळे नेहमीच चर्चेत असतो. ‘हनुमान’ चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक प्रशांत वर्मा लवकरच रणवीर सिंगसोबत ‘राक्षस’ हा चित्रपट बनवणार असल्याची माहिती समोर आली. या चित्रपटाची तयारीही सुरू झाली होती. परंतु आता या चित्रपटातून रणवीर सिंगने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंग आता राक्षस चित्रपटाचा भाग नसणार आहे. क्रिएटिव्ह मतभेदांमुळे रणवीर सिंगने हा चित्रपट करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. रणवीर सिंग या चित्रपटासाठी हैदराबादला गेला होता आणि चित्रपटाच्या घोषणेसाठी त्याने तिथे प्रोमोचे शूटिंग देखील सुरू केले होते. परंतु त्याला समजले की तो अद्याप दक्षिण भारतीय चित्रपटांसाठी कंफर्टेबल नाही. त्यामुळे प्रोमो शूटदरम्यान तो मुंबईत परतला आणि त्याने चित्रपट करण्यास नकार दिला.
रिपोर्टनुसार, निर्माते आणि रणवीर सिंग यांनी बोलून काही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यातून काही साध्य होऊ शकले नाही. शेवटी रणवीरने या चित्रपटातून बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारला. रणवीर सिंगने ‘राक्षस’ चित्रपट सोडल्यानंतर आता दिग्दर्शक प्रशांत वर्मा नव्या अभिनेत्याच्या शोधात आहेत. मात्र अद्याप याबाबत रणवीर आणि प्रशांतकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, मागील वर्षी रणवीरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र त्यानंतर त्याचा एकही चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. मात्र, ‘शक्तिमान’ आणि ‘डॉन’ मुळे तो चर्चेत आहे. लवकरच तो सिंघम अगेनमध्येही दिसणार आहे. मागील वर्षी फरहान अख्तरने त्याला त्याच्या हिट फ्रेंचाइजी डॉन ३ मध्ये मुख्य अभिनेता म्हणून कास्ट करण्याची घोषणा केली होती. डॉन ३ मध्ये रणवीरसोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे.
हेही वाचा:





