रांका ज्वेलर्सची गणेशोत्सवासाठी खास योजना; श्रीगणेश अलंकारांच्या घडणावळीवर 50% किंमतीचे व्हाऊचर

पुणे : महाराष्ट्रात सर्वत्र श्रीगणेश आगमनाची आतुरता वाढत असताना, गणेशोत्सवाचे औचित्य साधून रांका ज्वेलर्सतर्फे खास योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत श्रीगणेश अलंकारांच्या घडणावळीवर ग्राहकांना तब्बल ५० टक्के किंमतीचे व्हाऊचर देण्यात येणार आहे. या व्हाऊचरचा वापर करून फॅशन ज्वेलरी खरेदी करता येणार असल्याची माहिती देण्यात आली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रांका ज्वेलर्सने चांदीतील २,५०० पेक्षा अधिक नावीन्यपूर्ण श्रीगणेश अलंकारांची खास शृंखला उपलब्ध करून दिली आहे. यात चांदीचे मुकूट, निरांजन, समई, दुर्वा, केवड्याची पाने, केळी, चौरंग, जास्वंदीची फुले, कर्ण आभूषणे, कलश तसेच चांदीतील श्रीगणेश मूर्तींचा समावेश आहे.
ही विशेष योजना रांका ज्वेलर्सच्या पुण्यातील रविवार पेठ, लक्ष्मी रोड, कर्वे रोड, पिंपरी-चिंचवड, हडपसर, सिंहगड रोड, बाणेर, सातारा रोड, बंडगार्डन, कोकणे चौक (रहाटणी), कोंढवा, नगर रोड (खराडी) आणि वाघोली येथील दालनांमध्ये ७ सप्टेंबर २०२५ पर्यंत उपलब्ध राहणार आहे.
“सर्व गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पासाठी या विशेष अलंकारांची खरेदी करून उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा आणि या ऑफरचा लाभ घ्यावा,” असे आवाहन रांका ज्वेलर्सतर्फे करण्यात आले आहे.





