Ranjangaon News : दिव्यांगांच्या सक्षमीकरणाला ‘प्रहार’ची ताकद ; कारेगावात हक्काचे सेवा केंद्र सुरू

प्रभात वृत्तसेवा
रांजणगाव गणपती – शिरूर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतीच्या सौजन्याने दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘प्रहार महा ई सेवा केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. मा. राज्यमंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.कारेगाव येथे दिव्यांग युवक नितीन भास्कर गवारे यांनी ग्रामपंचायत संकुलात हे केंद्र सुरू केले आहे. दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही समाजाची जबाबदारी आहे.
गवारे यांचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केले.या केंद्राद्वारे दिव्यांगांच्या सर्व शासकीय कामांसाठी मोफत सेवा देण्याचा गवारे यांचा उपक्रम आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याला प्रहार संघटनेचा तसेच कारेगाव ग्रामपंचायतीचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला आहे.या वेळी प्रहारचे राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव, राज्य सचिव महेश बढे, विजयराव राऊत, जिल्हाध्यक्ष शरद जाधव, तालुकाध्यक्ष अनिता कदम, नारायण नवले, जिल्हा संघटक संभाजी नवले,
भास्करराव गवारे यांच्यासह नंदू नवले, संताजी तळेकर, निलेश जगताप, धनंजय कोहकडे, राघवेंद्र नवले, अमोल कोहकडे, मिलिंद कापरे, सुमित ओसवाल, नवनाथ नवले, भागीनाथ जगताप, मोनाली नवले, चंद्रकला नवले, मायाताई फलके, शोभा दुधाडे, माणिक दुंडे, तुकाराम गवारे, विलास नवले, सरपंच हौसाबाई जगताप, उपसरपंच नागेश शेलार, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहोकडे, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब बिबे, माजी सरपंच निर्मला नवले, संदीप नवले, पुष्पलता ओसवाल यांच्यासह प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





