रांजणगाव गणपती: कोरोना बाधिताच्या संपर्कातील ‘त्या’ दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह
Updated On:

रांजणगाव गणपती (प्रतिनिधी)- येथील कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या हाय रिक्स १६ जणां पैकी दोन जण पॉझिटिव्ह आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सातव यांनी सांगितले.
रांजणगाव गणपती येथे एक जण कोरोना आढळला होता, त्यामुळे रांजणगाव परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रांजणगाव १४ दिवस बंद ठेवण्यात आले आहे व पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३५ जणांपैकी १६ जणांना हाय रिक्स जाहीर करण्यात आले होते व बाकी १९ जणांना होमक्वारंटाइन करण्यात आले होते.
त्या १६ पैकी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्यामुळे नागरिकांनीही शासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन सरपंच सर्जेराव खेडकर यांनी केले आहे व शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असे सरपंच सर्जेराव खेडकर यांनी यावेळी सांगितले.





