शिवसेनेचे 35 आमदार पक्ष नेतृत्वावर नाराज राणेंचा दावा
Updated On:

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे 35 नेते पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत असा दावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
शिवसेनेचे आमदार आपल्या पक्षाच्या नेतृत्त्वात समाधानी समाधानी नसुन आमदारांमध्ये संताप आहे. नारायण राणे हे सध्या भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत.
राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. नारायण राणे म्हणाले की, राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकार राज्यात चांगले काम करत नाही. राज्यात सरकार स्थापण्यासाठी त्यांना पाच आठवड्यांचा कालावधी लागला असाही टोला त्यांनी लगावला.





