रणबीर कपूरचे हॉलीवूडमध्ये पदार्पण? ‘जेम्स बाँड’ चित्रपटातून करणार एन्ट्री

Ranbir Kapoor Hollywood Debut | अभिनेता रणबीर कपूरचा देशभरात मोठा चाहता वर्ग आहे. २००७ मध्ये ‘सावरिया’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. सध्या तो ‘लव्ह अँड वॉर’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. संजय लीला भन्साळी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. मात्र आता रणबीर हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर चित्रपट ‘जेम्स बाँड’ म्हणून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे बोले जात आहे. ॲक्शन मास्टर मायकेल बे यांच्या दिग्दर्शनाखाली तो हॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार आहे. टेलीचक्करच्या वृत्तानुसार, चित्रपटातील एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी निर्मिती संस्थेच्या टीमने रणबीरशी चर्चा सुरू केल्या आहेत. ब्रिटीश अभिनेता चिवेटेल एजिओफोर देखील या चित्रपटात सामील होण्याची शक्यता आहे. Ranbir Kapoor Hollywood Debut |
या चित्रपटाच्या शूटिंगची सुरूवात 2025 मध्ये होण्याची अपेक्षा आहे. रणबीर कपूरच्या हॉलिवूडमधील पदार्पणाविषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र या चर्चेने चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. चाहते रणबीर कपूरला हॉलिवूड चित्रपटामध्ये पाहण्यासाठी आतुर आहेत. मायकल बे यांनी ट्रान्सफॉर्मर्स आणि बॅड बॉइज यांन सारखे सुपरहिट चित्रपट केले आहे. रणबीरच्या हॉलीवूड पदार्पणच्या चर्चा समोर येताच चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. Ranbir Kapoor Hollywood Debut |
रणबीरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘वेक अप सिड’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘रॉकस्टार’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘ए दिल है मुश्किल’, ‘बर्फी’, ‘संजू’ आणि ‘अॅनिमल’ अशा अनेक चित्रपटांतून त्याने लोकप्रियता मिळवली. त्याचं ‘अॅनिमल’ हा चित्रपट २०२३ मधील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक बनला.
रणबीर ‘अॅनिमल पार्क’ या चित्रपटाच्या सिक्वेलचे शूटिंग करत आहे. शिवाय तो ‘लव्ह अँड वॉर’ मध्ये देखील दिसणार आहे. यात रणबीरसोबत आलिया भट्ट आणि विकी कौशल देखील पाहायला मिळणार आहेत. Ranbir Kapoor Hollywood Debut |
हेही वाचा:





