Ranbir Kapoor: रणबीर कपूरचा प्रसाद घेण्यास नकार; व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Ranbir Kapoor: 'रामायण' चित्रपटात रामाची भूमिका साकारत असल्याने रणबीरच्या प्रत्येक क्रियेवर नेटकऱ्यांचे बारीक लक्ष

Ranbir Kapoor: दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या आगामी मेगा बजेट ‘रामायण’ चित्रपटात बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. परंतु सध्या सोशल मीडियावर त्याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो गणपती बाप्पाचा प्रसाद म्हणजेच मोदक खाण्यास स्पष्ट नकार देताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये रणबीर कपूर गणपती दर्शनासाठी आला आहे. दर्शन घेतल्यानंतर तो तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींना मोदकाचा प्रसाद देत आहे. याचवेळी एकाने रणबीर कपूरलाही प्रसाद घेण्याची विनंती केली. तेव्हा रणबीरने प्रसाद घेण्यास नकार दिला. ‘मी तर डाएटवर आहे. तुम्ही खा’. रणबीरने प्रसाद घेण्यास नकार दिल्याने त्याच्यावर टीका झाली.
जरी हा जुना व्हिडिओ असला तरी रणबीर कपूरची ही गोष्ट नेटकऱ्यांना अजिबात आवडली नाही. डाएटच्या नावाखाली बाप्पाच्या प्रसादाला नकार देणे लोकांना खटकले. ‘प्रसादाचा एक छोटा तुकडा खाल्ल्याने लगेच तुझ्या शरीरावर परिणाम होणार नव्हता.’ ‘डाएटचं कारण एकदम बेकार आहे’,’याला बीफ दिलं तर तो खाईल’,’थोडा प्रसाद घेतला असता तर मरणार नव्हता,’ ‘बीफ खाणारा प्रसाद कसा खाईल आणि याला रामाची भूमिका दिली’ अशा कमेंट्स व्हिडीओवर आल्या होत्या.
View this post on Instagram
दरम्यान, ज्या व्हिडिओवरून रणबीर कपूरला ट्रोल केले जात आहे, तो व्हिडिओ २०२३ च्या गणेशोत्सवादरम्यानचा आहे. परंतु सध्या ‘रामायण’ चित्रपटात रामाची भूमिका साकारत असल्याने लोक आता रणबीरच्या प्रत्येक क्रियेवर बारीक लक्ष ठेवून आहेत. यात आता ‘रामायण’रिलीज आणि गणेशोत्सवामुळे व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला आहे.
तगडी स्टारकास्ट
रणबीर कपूर सध्या त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या ‘रामायण’ चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. हा चित्रपट दोन मोठ्या भागांमध्ये रिलीज केला जाणार आहे. चित्रपटात रणबीर कपूरसोबत दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे, तर ‘केजीएफ’ फेम यश यात रावणाची दमदार भूमिका साकारत आहे. याशिवाय सनी देओल हनुमान आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
या मोठ्या प्रोजेक्टव्यतिरिक्त रणबीर कपूर येत्या काळात ‘ॲनिमल पार्क’ आणि संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या मल्टीस्टारर चित्रपटातही आपल्या अभिनयाची जादू दाखवताना दिसणार आहे.
हेही वाचा:




