रणबीर कपूरने केलं बाप्पाचं विसर्जन, आलिया भट्ट नसल्याने नेटकऱ्यांनी साधला निशाणा

Ranbir Kapoor Ganpati Virajran | अभिनेता रणबीर कपूरच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदा मोठ्या उत्साहात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्याने आई नीतू कपूरसोबत मिळून पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन केले. मात्र यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री आलिया भट्ट उपस्थित नव्हती. यावरुन नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आलिया भट्ट गणपती विसर्जनात सहभागी झाली नव्हती, यामुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर तिला लक्ष केले आहे. “आलिया नेहमी अशा क्षणांपासून गायब का असते?”, “आलिया भारतीय सण का साजरे करत नाही?”,”आलिया गणपती विसर्जनात सहभागी झाली नाही, पण पार्टी तर खूप करते,” “आलिया सहभागी झाली नाही, ही खेदाची बाब आहे,” अशा कमेट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. Ranbir Kapoor Ganpati Virajran |
View this post on Instagram
यंदा रणबीर कपूर आई नीतू कपूर यांच्यासह गणरायाची मूर्ती घेऊन घराजवळील कृत्रिम तलावाठिकाणी पोहोचला. तिथे त्यांनी रीतसर आरती केली आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणत त्यांनी बाप्पाचं विसर्जन केलं. यावेळी रणबीरने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तर नीतू कपूर या ऑफ व्हाईट रंगाच्या ड्रेसमध्ये होत्या. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रणबीर कपूरच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर, तो आगामी ‘रामायण’ सिनेमात प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तो आलिया आणि विकी कौशल सह संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्येही दिसणार आहे. तो ‘अॅनिमल पार्क’,’ब्रह्मास्त्र २’ या सिनेमांमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. Ranbir Kapoor Ganpati Virajran |
हेही वाचा:
“मराठा आरक्षणाचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल, पण…”; अमित ठाकरेंनी केले मनसैनिकांना आवाहन





