Ranbir Kapoor In Ramayana: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या बहुचर्चित ‘रामायण’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो भगवान रामांची भूमिका साकारत आहे. मात्र, नुकत्याच एका कार्यक्रमात रणबीरने मोठा खुलासा करत सांगितले की, सुरुवातीला त्याने ही भूमिका करण्यास नकार दिला होता. ‘रामायण’ हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकतेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, २ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या निमित्ताने या चित्रपटातील रणबीर कपूरच्या ‘राम’ रूपातील पहिली झलक प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मोठ्या भूमिकेची भीती वाटत होती. त्यानंतर रणबीरने या भूमिकेसाठी केलेल्या तयारीबद्दलही सांगितले. त्याच्या मते, रामाच्या भूमिकेची तयारी त्याने लहानपणापासूनच सुरू केली होती, जेव्हा त्याने रामायण ही मालिका पाहिली होती. ही कथा भारतीयांच्या मनात खोलवर रुजलेली आहे, त्यामुळे या भूमिकेसाठी केवळ शारीरिक नव्हे, तर भावनिक आणि आध्यात्मिक तयारी करावी लागली. Ramayana: Ranbir Kapoor रणबीरच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्याचे वडील होणे. त्याने सांगितले की, मुलगी राहा कपूर जन्माला आल्यानंतर त्याच्या आयुष्यात मोठा बदल झाला. त्यावेळी त्याने स्वतःकडे आणि आपल्या आयुष्याकडे नव्याने पाहायला सुरुवात केली. याच काळात ‘रामायण’चा प्रस्ताव पुन्हा समोर आला आणि त्याचा दृष्टिकोन बदलला. रणबीर म्हणाला की, “वडील होणे आणि भगवान रामाची भूमिका साकारणे, हा माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला.” या अनुभवामुळे त्याची भीती हळूहळू कृतज्ञतेत बदलली आणि त्याने ही भूमिका स्वीकारण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी करत आहेत. ‘रामायण’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या आणि महागड्या प्रकल्पांपैकी एक मानला जात आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत तर दुसरा भाग २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात रणबीर कपूरसोबत साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आणि रवि दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. एकूणच, रणबीर कपूरचा हा प्रवास भीतीपासून आत्मविश्वासापर्यंतचा असून, त्याची ही भूमिका प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.