Ranbir Kapoor: ‘कॅमेरा मुंह के अंदर डाल रहा है, पागल…’, रणबीर कपूरने पापाराझीला फटकारले
Ranbir Kapoor: रणबीर कपूरने अगदी हलक्या-फुलक्या अंदाजात कॅमेरामनची फिरकी घेतली.

Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रणबीर ‘इंडियन सुपर गेमिंग लीग’मध्ये सहभागी होण्यासाठी आला असता त्याच्याभोवती मीडिया आणि पापाराझींनी एकच गर्दी केली. त्यादरम्यान रणबीर पापाराझीवर संतापल्याचा पाहायला मिळाले.
व्हायरल व्हिडीओमध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) क्लासी अंदाजात दिसतोय. त्यानं सिंपल पण स्टायलिश कपडे वेअर केले होते. रणबीरनं व्हाईट टी-शर्टवर एक जॅकेट वेअर केलेलं, जे त्यानं ब्लॅक पँट आणि व्हाइट स्नीकर्ससोबत टीम-अप केलं होतं.
View this post on Instagram
यावेळी मीडिया आणि पापाराझींनी गर्दी करताच एक कॅमेरा रणबीरच्या अगदीच तोंडाजवळ गेला. तेवढ्यात रणबीर वैतागला आणि कॅमेऱ्यामनला फटकारलं. त्याने कॅमेरामनला म्हंटले की, ‘कॅमेरा मुंह के अंदर डाल रहा है, पागल…’ त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पण, रणबीरनं अगदी हलक्या-फुलक्या अंदाजात कॅमेरामनची फिरकी घेतली. रणबीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्याचे कौतुक केले. ‘रणबीरनं गर्दीची परिस्थिती अतिशय समजूतदारपणे हाताळली, कॅमेरामनला फटकारलं पण अगदी हलक्या-फुलक्या शब्दांत…’ असे काहींनी कमेंट करत म्हंटले.
रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, रणबीर नितेश तिवारीच्या ‘रामायण – भाग 1’मध्ये भगवान रामाची भूमिका साकारणार आहे. तर यात साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 2026 च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:
Taapsee Pannu: “बॉलिवूडमध्ये हीरोच ठरवतो हीरोइन?”…तापसी पन्नूचा धक्कादायक खुलासा





