“पापाराझींना काही बोललात, तर…”; राखी सावंतचा जया बच्चन यांना इशारा

Rakhi Sawant | बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी पापाराझींबद्दल केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चांगलीच चर्चा झाली. यावरून त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली. अशातच आता राखी सावंतने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राखी सावंत एका नव्या लुकमध्ये थेट निळा ड्रम घेऊन कॅमेऱ्यासमोर आली होती. तेव्हा तिने जया बच्चन यांच्यावर हल्लाबोल केला. ‘जयाजी माझ्या पॅप्सना काही बोलू नका, नाही तर या ड्रममधून तुम्हाला घेऊन जाईन,’ असा इशारा दिला.
राखी सावंत पापाराझींसोबत संवाद साधताना म्हणाली, ‘हा ड्रम मी जया बच्चन यांच्यासाठी आणला आहे. जर त्या माझ्या पापाराझींना काही बोललात, तर तुम्हाला या ड्रममध्ये बसवून घेऊन जाईन. आधी स्वतःचे कपडे ठीक करा, आज पापाराझी आहेत म्हणून आपण आहोत. मला त्यांचा अभिमान आहे.’ राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. Rakhi Sawant |
View this post on Instagram
नेमकं काय म्हणाल्या जया बच्चन?
एका कार्यक्रमात पापाराझींसोबत त्यांचं नातं कसं आहे? असा प्रश्न जया बच्चन यांना विचारण्यात आला. यावर जया बच्चन म्हणाल्या, “मला माध्यमांचा खूप आदर आहे. माझे वडील पत्रकार होते. पण हे पापाराझी कोण आहेत? कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग नाही, घाणेरडी पँट घालून, हातात मोबाइल घेऊन फिरतात आणि फोटो काढतात. हे मीडिया कसे? त्यांचं एज्युकेशन काय? बॅकग्राऊंड काय?” अशा शब्दांत जया बच्चन यांनी पापाराझींवर टीका केली होती. याआधी देखील अनेकदा याच कारणामुळे जया बच्चन वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. Rakhi Sawant |
हेही वाचा:





