Pune News : गॅरेज चालकाकडे खंडणी मागणारा अटकेत
Pune News : कोयत्याचा धाक दाखवून १५ हजारांची रोकड आणि दरमहा ५ हजार रुपयांच्या हप्त्याची खंडणी मागणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला नांदेड सिटी पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.

Pune News : गॅरेज चालकाकडे दरमहा पाच हजार हप्ता देण्याची मागणी करणाऱ्या सराइताला नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली. सुमीत उर्फ बंटी रणजीत गायकवाड ( २४, रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. (Pune News)
याबाबत एका गॅरेज चालकाने नांदेड सिटी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाचे सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरात गॅरेज आहे. शनिवारी (२४ ऑक्टोबर) दुपारी पावणेचारच्या सुमारास गायकवाड तक्रारदार तरुणाच्या गॅरेजमध्ये आला. (Pune News)
त्याच्याकडे कोयता होता. तक्रारदार तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून आरोपीने त्याला १५ हजार रुपये देण्याची मागणी केली, तसेच त्याला दरमहा पाच हजार रुपये हप्ता मागितला. तक्रारदार तरुणाने नकार दिल्यानंतर आरोपीने काेयता उगारुन दहशत माजविली. (Pune News)
घाबरलेल्या तक्रारदाराने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पसार झालेला आरोपी गायकवाड याला पोलिसांनी अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत तपास करत आहेत. (Pune News)
Pune News : तळोजा गोळीबार प्रकरणातील तीन आरोपी पुण्यात जेरबंद; आंबेगाव पोलिसांची कारवाई





