Ramraje Naik Nimbalkar : रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार का? अजित पवारांच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीने स्पष्टच सांगितलं….

Amol Mitkari । Ramraje Naik Nimbalkar : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत नाराज असून, ते आता अजित पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.
लवकरच घड्याळाची साथ सोडून तुतारी हाती घेणार असल्याची माहिती आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण जवळच्या खटके वस्ती इथं कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला.
रात्री कार्यकर्ते म्हणतील तो निर्णय घेणार असल्याचं रामराजे यांनी म्हटलं आहे. रामराजे यांच्यासोबत विद्यमान आमदार दीपक चव्हाण देखील अजित पवारांची साथ सोडण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, रामराजे नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2015 ते 2016 आणि 2016 ते 7 जुलै 2022 या कालावधीत ते विधान परिषदेचे 13 अध्यक्ष होते.
दरम्यान, अश्यातच अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार गटात जाण्याचे वृत्त फेटाळून लावले. ते म्हणाले की, “ही अत्यंत चुकीची माहिती आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचा आजचा मेळावा कार्यकर्त्यांशी हितगुज करण्यासाठी घेतलेला नाही.
याचा अर्थ रामराजे निंबाळकर आणि दीपक चव्हाण शरद पवार गटात जाणार, असा होत नाही. तुतारी हे काय वैश्विक चिन्हं झालं आहे का? महायुतीचे नेते जरुर इतर पक्षांमध्ये जात आहेत. पण शरद पवार गटात बंपर भरती वगैरे सुरु नाही.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी यापूर्वीही काहीही चर्चा होऊ दे, मी दुसरीकडे जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. ते घाईगडबडीत कुठलाही निर्णय घेणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल वेळ पडल्यास त्यांच्याशी चर्चा करतील, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले.





