पुणे जिल्हा | श्रीरामनगर येथे रामनवमी उत्साहात साजरी

खेड शिवापूर, (वार्ताहर) – शिवगंगा खोऱ्यातील श्रीरामनगर (ता. हवेली) येथे बुधवार, दि. १७ पासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता. नऊ दिवस सुरू असलेल्या सप्ताहाची सांगता रामनवमी उत्साहात साजरी करून करण्यात आला. येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले.
शिवगंगा खोऱ्यातील श्रीरामनगर येथे श्रीरामाचे भव्य मंदिर आहे. त्यामुळे भागातील अनेक भाविक याठिकाणी दर्शनासाठी गर्दी करीत असतात. गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत या उत्सवात कीर्तनाचे कार्यक्रम संपन्न झाले. दुपारी बारा वाजता रामजन्म झाला. त्यानंतर गावातील महिलांनी श्रीरामाचा पाळणा म्हणून महाप्रसादाचे वाटप करण्यात आला.
याप्रसंगी पुणे जिल्हाप्रमुख तसेच पीएमआरडीएचे संचालक रमेश कोंडे, खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर, जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, श्रीरामनगरचे सरपंच अक्षदा बांडेहवलदार, राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजेंद्र पवार, बुवा खाटपे, उबाठा सहसंपर्क संघटिका बारामती लोकसभा स्वाती ढमाले,
कात्रज दूध संघाचे चेअरमन भगवान पासलकर, शंकर कोंडे, नितीन वाघ, त्र्यंबक मोकाशी, नगरसेवक सचिन दोडके, उवा सेना हवेली तालुका प्रमुख आदित्य बांडेहवालदार तसेच परिसरातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भाविकांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ श्रीरामनगर यांनी केले होते व संपूर्ण महाप्रसाद अनिल महागरे यांनी दिला होता.





