रामदास कदम म्हणाले,’कुठल्याही परिस्थितीत धनुष्यबाण आम्हालाच मिळेल’

मुंबई – आमची शिवसेना ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत धनुष्यबाण आम्हालाच मिळेल. दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला वेळ लागणार नाही. यावर आजच निर्णय होईल,” अस म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचं या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे.
दरम्यान,शिवसेनेचा शिंदे गट आज (शुक्रवार) निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे. त्या भेटीवेळी पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर दावा सांगितला जाणार आहे. शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे हे दोन्ही गट पक्षावर दावा सांगत आहेत. आज शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचं या प्रकरणावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे.
अशात अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या पोटनिवडणुकीत ठाकरे गट आपला उमेदवार देणार आहे. शिंदे गट ती पोटनिवडणूक लढवणार नाही. त्या गटाचा भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा असेल, पण पोटनिवडणूक विचारात घेऊन शिंदे गट निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहे. त्यामागे ठाकरे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळू नये अशी खेळी असल्याचे मानले जाते.





