Ramdas Kadam : भाजपला हाताशी धरून शिंदेंविरोधात षडयंत्र; रामदास कदमांचे मनोज जरांगेंवर स्फोटक आरोप
Ramdas Kadam : शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांच्यावर अत्यंत गंभीर व खळबळजनक आरोप केले आहेत.

Ramdas Kadam : मनोज जरांगे सर्वांना फसवत आहेत. भाजपचे नेते प्रसाद लाड हे जरांगेंसोबत जेवण करतात. अशामध्ये मनोज जरांगेंनी भाजपला हाताशी धरून एकनाथ शिंदेंविरोधात षडयंत्र रचत आहेत, असा गंभीर आरोप शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. (Ramdas Kadam)
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या 500 कोटींच्या आरोपानंतर आणि त्यांनी माध्यमांना दिलेल्या ऑडिओनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यावर रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. (Ramdas Kadam)
रामदास कदम म्हणाले, मनोज जरांगे, हे तुमचे जिवाभावाचे मित्र भाजप आमदार प्रसाद लाड बघा. तुमच्या शेजारी बसून जेवत आहेत, पुष्पगुच्छ देऊन तुमचे स्वागत करत आहेत. तसेच, खांद्याला खांदा लावून गप्पा मारत आहेत. (Ramdas Kadam)
ज्या बैठकीत तुम्ही 70 टक्के एकनाथ शिंदेंचे चमचे बसले आहेत, असे म्हणालात. त्या बैठकीत भाजपचे हेच आमदार प्रसाद लाड उपस्थित होते, असे म्हणत त्यांनी पत्रकार परिषदेत फोटो दाखवत जरांगेंवर टीका केली. (Ramdas Kadam)
जरांगेंनी शिंदेंना चमचे म्हटल्यानंतर त्या बैठकीत बसलेले मराठा समाजाचे बाळासाहेब इंगळे ताडकन उभे राहिले आणि त्यांनी जरांगेंना, ‘तुम्ही एकनाथ शिंदेंविरोधात बोलणार असाल तर आम्ही निघालो, असे तोंडावर सुनावले होते. (Ramdas Kadam)
मराठा समाजाने जरांगेंना डोक्यावर घेतले, पण आता हे टेंडर्स, जमिनी आणि राजकीय सुपाऱ्यांच्या नादात स्वतःच्याच समाजातील मोठ्या नेत्याला संपवायला निघाले आहेत, असे म्हणत त्यांनी टीका केली. (Ramdas Kadam)
Ramdas Kadam : ‘जरांगे, तू आहेस कोण? एकनाथ शिंदे आमचं दैवत’; रामदास कदमांचा मनोज जरांगेंवर घणाघात





