नागालॅंडमध्ये रामदास आठवलेंना यश; ‘इतक्या’ जागांवर मिळाला विजय
Updated On:

कोहिमा – नागालॅंडमध्ये भाजपच्या युतीने चांगली आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला आहे. यात रामदास आठवले गटाच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने दोन जागांवर विजय मिळवला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या इमतीछोबा यांनी तुनसंग सदर विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला.
त्यांनी एनडीपीपीचे उमेदवार के. ओडिबेनडंग चांग यांचा 400 मतांनी पराभव केला. तर आठवले गटाचे उमेदवार वाय लीमा ओनेने चांग यांनी नोकसेन विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी एनडीपीपीच्या एच. चूबा चांग यांना 188 मतांनी हरवले. पहिल्यांदाच आरपीआयने नागालॅंडमध्ये निवडणूक लढवली होती. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी दोन जागा जिंकल्या आहेत.




