‘मोदी सरकारने आपली धर्मनिरपेक्ष भूमिका…’ ; वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर रामदास आठवले यांचे मोठे विधान

Ramdas Athawale on Waqf Bill । वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२५ रात्री राज्यसभेत मंजूर झाले आहे. यामुळे या विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे. गुरुवारी वरिष्ठ सभागृहात सादर झाल्यानंतर, ११ तासांच्या चर्चेनंतर शुक्रवारी पहाटे हे विधेयक मंजूर करण्यात आले. विधेयकाला १२८ मते मिळाली तर ९५मते विधयेकाच्या विरोधात पडली. लोकसभेने ते आधीच मंजूर केले होते. राज्यसभेतून मंजूर झाल्यानंतर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया आली आहे.
मोदींनी सर्वांसमोर धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन मांडला Ramdas Athawale on Waqf Bill ।
रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया देताना, “हे विधेयक मुस्लिमांविरुद्ध नाही. आम्हाला गरीब मुस्लिमांना पाठिंबा द्यायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामाध्यमातून सर्वांसमोर त्यांचा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन मांडला आहे.” असे म्हणत पंतप्रधानांचे कौतुक केले.
VIDEO | Waqf (Amendment) Bill gets nod in Rajya Sabha: “This Bill is not against Muslims. We want to support poor Muslims. PM Modi has put forward his secular stand,” says Union Minister Ramdas Athawale (@RamdasAthawale). pic.twitter.com/wom2fRW1bW
— Press Trust of India (@PTI_News) April 3, 2025
या अगोदर आठवले म्हणाले होते की, “हे विधेयक सामान्य मुस्लिमांच्या बाजूने आहे. विरोधक जाणूनबुजून त्यांना गोंधळात टाकत आहेत. वक्फ बोर्ड नेहमीच काही लोकांच्या हातात राहिले आहे. या विधेयकाबाबत राजकारण केले जात आहे. हे विधेयक मुस्लिमांच्या फायद्यासाठी आहे. वक्फ बोर्डाची संपूर्ण मालमत्ता काही लोकांच्या हातात होती आणि त्यामुळे सामान्य मुस्लिमांना फायदा झाला नाही.”
किरण रिजिजू यांनी हे आरोप फेटाळले Ramdas Athawale on Waqf Bill ।
वक्फ विधेयक मंजूर करण्यासाठी राज्यसभेची बैठक शुक्रवारी पहाटे २:३० वाजेपर्यंत चालली. विरोधी पक्षाच्या सर्व दुरुस्त्या फेटाळल्या गेल्या. तामिळनाडूतील द्रमुक खासदार तिरुची शिवा यांच्या दुरुस्तीवर मतांची विभागणी झाली, परंतु ही दुरुस्ती देखील फेटाळण्यात आली. चर्चेला उत्तर देताना, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत की सरकारने अल्पसंख्याकांना घाबरवण्यासाठी हे विधेयक आणले आहे.
ते म्हणाले की, विरोधी पक्ष मुस्लिमांना घाबरवण्याचे आणि दिशाभूल करण्याचे काम करत आहे. या विधेयकामुळे मुस्लिमांचे कोणतेही नुकसान होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. विरोधी पक्षाच्या खासदारांना मुस्लिमांची दिशाभूल करू नका असे आवाहन करताना किरेन रिजिजू म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय खूप विचारपूर्वक घेतला आहे. ते (विरोधी पक्षाचे सदस्य) वारंवार म्हणत आहेत की आम्ही मुस्लिमांना घाबरवत आहोत, पण तसे नाही. मुस्लिमांना घाबरवणारे आम्ही नाही तर तुम्ही आहात.
विधेयक सादर करताना किरण रिजिजू म्हणाले होते की वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनार्थ लहान-मोठ्या एक कोटी सूचना आल्या आहेत. संयुक्त संसदीय समितीने विधेयकावर लोकांचे मत जाणून घेण्यासाठी १० शहरांना भेट दिली आणि २८४ संघटनांशी चर्चा केली. आज ८.७२ लाख वक्फ मालमत्ता आहेत.





