‘रामायण’ चित्रपटातील अपडेट समोर; आणखी एका अभिनेत्याची होणार एन्ट्री

Ramayan Film | मागील काही दिवसांपासून ‘रामायण’ चित्रपट चर्चेत आहे. नितीश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर प्रभु श्री रामची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय सई पल्लवी सीतामातेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या सिनेमात अनेक कलाकार पाहायला मिळणार आहे. यातच आता या चित्रपटाबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे. या सिनेमात आणखी एका कपूरची एन्ट्री होणार आहे.
अभिनेता कुणाल कपूर देखील या चित्रपटाचा भाग असणार आहे. कुणाल सध्या रिहर्सल आणि कॉस्च्युम ट्रायलमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी आतापर्यंत कास्ट करण्यात आलेल्या बहुतांश कलाकारांच्या पात्रांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र यात कुणाल कपूरची भूमिका नेमकी कोणती असणार याबाबत माहिती समजू शकलेली नाही.
View this post on Instagram
‘रंग दे बसंती’, ‘आजा नच ले’,’लव्ह शव्ह ते चिकन खुराना’ या सिनेमांमध्ये कुणाल कपूर दिसला होता. त्यानंतर तो शेवटचा सिनेमा २०२१ मध्ये ‘अनकही कहानिया’ चित्रपटात दिसला. यानंतर तो कुठेच दिसला नाही.
रणबीर, साई पल्लवीसह सनी देओल, विजय सेतुपती, लारा दत्ता, अजिंक्य देव या कलाकारांची देखील सिनेमात एन्ट्री झाली आहे. दरम्यान, साई पल्लवीच्या आधी आलिया भट्ट सीतेची भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या पण त्यानंतर सईला संधी मिळाली.
हेही वाचा





