Ram Mandir: दान चोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची राममंदिर ट्रस्टला नोटीस ; एसआयटीकडून अहवाल मागवला
Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराचे देऊळ चोरीचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज या प्रकरणावर सुनावणी करताना रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला नोटीस बजावली आहे.

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराचे दान चोरीचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज या प्रकरणावर सुनावणी करताना रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला नोटीस बजावली आहे.
यासोबतच या प्रकरणाचा तपास अहवालही एसआयटीकडून मागवण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या सोमवारी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.
राम मंदिर चोरी प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर झाली. खंडपीठाने उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या एसआयटी तपासाचा स्टेटस रिपोर्ट मागवला आहे.
न्यायालयाने आजच्या सुनावणीत, ‘आम्ही उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीला स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश देतो. सोमवारी पुढील सुनावणीसाठी या प्रकरणाची यादी करा आणि स्टेटस रिपोर्टमध्ये एसआयटीच्या स्थापनेची माहिती द्या” असे आदेश दिले आहेत.
सॉलिसिटर जनरल कोर्टात काय म्हणाले? Ram Mandir:
सुनावणीदरम्यान एका वकिलाने न्यायालयाला सांगितले की, उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. यावर सॉलिसिटर जनरल म्हणाले की ते उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने हजर होत आहेत.
न्यायालयाने विचारले की ते केंद्र सरकारची नोटीस देखील स्वीकारतील का, ज्याला त्यांनी सहमती दर्शविली. मात्र, नंतर न्यायालयाने स्पष्ट केले की, सध्या केवळ ट्रस्टला नोटीस बजावली जात आहे. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला स्वतंत्र नोटीस बजावण्यात आली नाही.
या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी Ram Mandir:
सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल यांनी न्यायालयाला सांगितले की, केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकार या प्रकरणी न्यायालयाला सर्वतोपरी मदत करतील. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या सोमवारी निश्चित केली आहे. तोपर्यंत एसआयटीला आपला स्टेटस रिपोर्ट कोर्टात सादर करावा लागेल.






