Ram Gopal Varma: ‘हाय रामा’ गाण्यामागची मजेदार गोष्ट; दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सांगितला पडद्यामागचा ड्रामा!

Ram Gopal Varma : एक लोकप्रिय गाणे तयार होईपर्यंत किती मोठा संघर्ष करावा लागतो, हे अनेकांना ठाऊक नसते. अशाच एका प्रसिद्ध गाण्यामागची मनोरंजक आणि थोडी ड्रामेबाज गोष्ट अलीकडेच समोर आली. 1995 साली प्रदर्शित झालेल्या ‘रंगीला’ या सुपरहिट चित्रपटातील ‘हाय रामा’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र या गाण्याच कंपोजिशन आणि शूटिंग ही प्रक्रिया दिग्दर्शकासाठी खूपच धावपळीची आणि ताणतणावाची ठरली होती.
प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या लोकप्रिय ‘रंगीला’ या चित्रपटातील गाजलेल्या ‘हाय रामा’ या गाण्यामागची एक मजेशीर आणि थोडी ड्रामेटिक गोष्ट उघड केली आहे. या गाण्याचे संगीत ए. आर. रहमान यांनी दिले होते.
वर्मा यांच्या मते, गोवा येथे गाण्याचे शूटिंग आणि म्युझिक फाइनल करण्यासाठी संपूर्ण टीम काही दिवस थांबली होती. पण त्या काळात संगीतकार रहमान सतत गाण्याचे काम पुढे ढकलत राहिले. पहिल्या दिवशी “उद्या सांगतो”, नंतर दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळ कारण असं करत पाच दिवस निघून गेले.
या विलंबामुळे दिग्दर्शकांना मोठी चिडचिड होत होती. शेवटी रहमान यांनी सांगितले की गोव्यातील हॉटेलमध्ये ते सतत टीव्ही पाहत होते आणि त्यामुळे गाण्यावर लक्ष केंद्रित करू शकले नाहीत. त्यामुळे पुढच्या वेळी जिथे गाणे तयार करायला नेले जाईल तिथे टीव्ही नको, अशी त्यांची विनंती होती. हे ऐकून वर्मा हसत म्हणाले, “त्या वेळी मला त्याला मारावंसं वाटत होतं.”
शेवटी गाणे तयार झाले आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. आजही ‘हाय रामा’ हे गाणे लोकप्रिय आहे. वर्मा म्हणतात की उत्कृष्ट कामासाठी कधी कधी संयम, थोडी धावपळ आणि हलका फुलका विनोदही आवश्यक असतो.





