काकाच्या प्रचारासाठी आलेल्या राम चरणचे धक्काबुक्कीत फाटले कपडे; Video व्हायरल….

Ram Charan | Political Campaign | Pawan Kalyan : साऊथचा सुपरस्टार ‘राम चरण’ हा अशा स्टार्सपैकी एक आहे ज्याच्यावर वडिलांच्या स्टारडमची छाया पडली नाही आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘आरआरआर’ या चित्रपटाद्वारे राम चरण जागतिक स्टार बनला आहे. त्याच्यावर चित्रित केलेल्या नाटू नाटू या गाण्याला 2023 मध्ये ऑस्कर मिळाला होता.
दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी त्याला आरआरआरमध्ये काम करण्यासाठी 45 कोटी रुपये दिले. राम चरणची गणना साऊथच्या सुपरस्टार्समध्ये केली जात असली तरी त्याने केवळ एकच बॉलिवूड चित्रपट केला आहे. राम चरणने 2013 मध्ये जंजीर चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
राम चरणचा जन्म 27 मार्च 1985 रोजी चेन्नई येथे झाला. तेलुगू चित्रपट सुपरस्टार चिरंजीवी यांचा मुलगा आहे. राम चरणच्या आईचे नाव सुरेखा आहे. रामच रणचा स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग आहे. अश्यातच सध्या अभिनेत्याचा एक व्हिडिओ मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
नुकतंच राम चरण आपले काका आणि अभिनेते पवन कल्याण यांच्या निवडणूक प्रचारासाठी आंध्रप्रदेशमधील पीठापुरम भागात पोहचला होता. यावेळी अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने गर्दी जमली होती. यावेळी काही चाहत्यांनी रामचरणचा शर्टही खेचण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
This is bad. Stardom comes with a heavy price and no privacy #RamCharan
— Haricharan Pudipeddi (@pudiharicharan) May 11, 2024
पवन कल्याण हे मेगास्टार चिरंजीवीचे भाऊ आणि जनसेना पक्षाचे संस्थापक आहेत. त्यांच्या प्रचारासाठी अभिनेता रामचरण रविवारी पीठापुरम याठिकाणी पोहोचला होता. रामचरणचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारासाठी तो सर्वसामान्यांमध्ये पोहोचला, तेव्हा तुफान गर्दी झाली.
या व्हिडीओमध्ये रामच रणला चाहत्यांच्या गर्दीने घेरल्याचं पहायला मिळत आहे. त्या गर्दीतून बाहेर पडण्याचा पुरेपूर प्रयत्न तो करतोय. मात्र अशातच आजूबाजूचे चाहते त्याचा शर्टसुद्धा खेचतात. काहीजण त्या गर्दीतही मोबाइल काढून रामचरणसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात. त्याला लोकांच्या धक्काबुक्कीचाही सामना करावा लागतो.





