Dudinska Athletics Competition ( 20km Race Walk) : भारतीय ॲथलीट राम बाबू चमकला, ऑलिम्पिकसाठी मिळवली पात्रता…

Paris 2024 Olympics ( 20km Race Walk) :- भारताच्या राम बाबूने शनिवारी स्लोव्हाकियातील डुडिंस्का- ५० मीटमध्ये १:२०:०० सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पुरुषांच्या २० किमी शर्यतीत पात्रता मिळवली.
हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत ३५ किमी चालण्याच्या शर्यतीत कांस्यपदक विजेत्या बाबूने उत्कृष्ट कामगिरी केली आणि या ‘रेस वॉकिंग टूर’च्या सुवर्ण स्तराच्या स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले. या स्पर्धेत भारतीय खेळाडू पोडियमवर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. ऑलिम्पिक पात्रतेसाठी कट ऑफ मानक १:२०:१० सेकंद असे आहे.
पेरूच्या सेझर रॉड्रिग्जने १:१९:४१ सेकंद वेळेसह पहिले स्थान पटकावले तर इक्वेडोरच्या ब्रायन पिंटाडोने १:१९:४४ सेकंद वेळेसह दुसरे स्थान पटकावले.
अशा प्रकारे बाबू (वय-२४) हा पात्रता मानक ओलांडणारा देशातील सातवा ठरला. अक्षदीप सिंग, सूरज पनवार, सर्व्हीन सेबॅस्टियन, अर्शप्रीत सिंग, प्रमजीत बिश्त आणि विकास सिंग हे इतर चालणारे खेळाडू आहेत.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/t20-world-cup-2024-aqib-javed-as-bowling-coach-of-sri-lanka/
महिलांमध्ये, प्रियांका गोस्वामी ही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी एकमेव वॉक ऍथलीट आहे. प्रियांकाने गेल्या वर्षी झारखंडमध्ये ऑलिम्पिक पात्रता दर्जा गाठला होता.
एखादा देश वैयक्तिक ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये केवळ तीन खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये पाठवू शकतो, त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये या सात खेळाडूंपैकी कोणाला पाठवायचे हे आता अँथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (एएफआय) वर अवलंबून असेल.





