Paris Olympics 2024 (Boxing) : लवलिना बोर्गोहेन उपांत्यपूर्व फेरीत दाखल, अन्य बॉक्सर्सनी केली निराशा…

Paris Olympics 2024 (Boxing, Lovlina Borgohain) : भारतीय बॉक्सर लवलिना बोर्गोहेनने पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये तिच्या मोहिमेची जोरदार सुरुवात केली आहे आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. बुधवारी, महिलांच्या 75 किलो गटातील राऊंड ऑफ 16 सामन्यात तिने नॉर्वेच्या सुनिव्हा हॉफस्टेडचा 5-0 ने एकतर्फी पराभव केला. टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये 69 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकणारी लवलिना यावेळी 75 किलो गटात भाग घेतला आहे.
What a Start!
Olympic Bronze medallist Lovlina Borgohain secures her spot in the quarterfinals with a commanding 5-0 victory over Norway’s Sunniva Hofstad in the women’s 75kg round of 16 bout.@LovlinaBorgohai @mansukhmandviya @IndiaSports@MIB_India @PIB_India @DDNewslive… pic.twitter.com/USafpRnVET— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 31, 2024
उपांत्यपूर्व फेरीत लवलिना समोर जागतिक क्रमवारीत अव्वल असणाऱ्या चीनच्या ली कियानचे आव्हान असणार आहे. चीनीची ली ही बॉक्सरने दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकले आहे. लवलिनाला तिने आशियाई स्पर्धेत पराभूत केले होते. त्यामुळे चीनची बॉक्सर ली ला पराभूत करून पराभवाची परतफेड करण्याची नामी संधी लव्हलिनला मिळाली आहे.
Paris Olympics 2024 (TableTennis) : महिला एकेरीत मनिका बत्राचे आव्हान संपुष्टात …
यापूर्वी लवलिनाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 69 किलो वजनी गटाचे कांस्यपदक मिळविले होते. जागतिक क्रमवारीत लवलिना सध्या चौथ्या स्थानावर आहे. तीन वर्ल्ड चॅम्पियनशिपची पदके आणि एक ऑलिम्पिकचे कांस्य पदक तिने मिळविले आहे. अशी कामगिरी करणाऱ्या लवलिनाकडून भारताला बॉक्सिंगमध्ये पदकाची आशा आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत जाण्यासाठी लवलिनाला चीनची बॉक्सर ली कियानचा पराभव करावा लागणार आहे.
JSW Sports athlete Preeti Pawar delivered a thrilling performance in her Round of 16 match against Yani Arias, narrowly losing 3-2. Despite the close defeat, she fought valiantly and will come back even stronger next time. We believe in you, Preeti! 🇮🇳 #JSWSports #Paris2024 pic.twitter.com/6in5cgyJ9n
— JSW Sports (@jswsports) July 31, 2024
अन्य भारतीय बॉक्सर्सनी केली निराशा….
अमित पंघाल आणि जास्मिन लांबोरिया यांच्यानंतर प्रीती पवारही उपउपांत्यपूर्व फेरीतूनच बाहेर पडली. आज झालेल्या अन्य लढतीत भारताची बॉक्सर प्रीती पवारला 54 किलो वजनी गटात पराभवाचा सामना करावा लागला. प्रीतीला कोलंबियाच्या एनी अरियासकडून 3-2 असा पराभव स्वीकारला लागला. त्यामुळे प्रीतीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.





