Rakul Preet Singh: अन् चारचौघात झाली ‘रकुलप्रीत सिंह’ची फजिती; तोंडावर पडता पडता वाचली अभिनेत्री, पाहा Video

Rakul Preet Singh | Dharmaveer-2 Trailer Launch: हिंदी आणि तामिळ सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ‘रकुलप्रीत सिंह’ आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. रकुलने 10 जानेवारी 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यारियां’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर रकुलप्रीतने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे.
कधी चित्रपटांमुळे, कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी लूकमुळे चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीचा सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. रकुल इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते आणि तिचे आगामी चित्रपट, प्रोजेक्ट याबद्दल ती फॅन्सला माहिती देत असते.
व्हायरल झालेला हा व्हिडिओ ‘धर्मवीर 2’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच दरम्यानचा आहे. झालं असं की, अभिनेत्री रकुल प्रीत सिंह या ट्रेलर लाँचमध्ये पती जॅकी भगनानी याच्यासोबत पोहोचली होती.
मात्र, ट्रेलर लाँचचा कार्यक्रम झाल्यानंतर बाहेर पडत असलेली रकुल प्रीत सिंह ही तोंडावर पडता पडता वाचलीये. रकुल प्रीत सिंह ही जात असतानाच अचानक तिचा पाय घसरतो आणि ती पडत असतानाच तिचा पती जॅकी भगनानी हा तिला पकडतो.
Rakul and Jacky: A match made in heaven, shining brighter together every day. 💫❤️#rakulpreetsingh #jackky #bloggbuzz #like #comment #share #follow pic.twitter.com/NSiXUphl4W
— Blogg Buzz (@blogg_buzz) July 21, 2024
यानंतर स्वत:ला सांभाळताना रकुल प्रीत सिंह ही दिसत आहे. ज्यावेळी अभिनेत्रीचा पाय घसरतो, यावेळी उपस्थित पापाराझी हे हसताना दिसत आहेत. आता याचेच फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होत असून, नेटकरी अभिनेत्री ट्रोल करत आहेत. ‘इतकी मोठी हिल्स घालण्याची काय गरज आहे.’ अशी कमेंट नेटकरी करत आहेत.
दरम्यान, ‘धर्मवीर-2’ सिनेमा हा सिनेमा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच नाही,तर संपूर्ण देशभरात हा सिनेमा प्रदर्शित केला जाईल. धर्मवीर या सिनेमानंतर धर्मवीर 2 सिनेमाची प्रेक्षकांना बरीच उत्सुकता होती. येत्या 9 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





