रकुल प्रीत – जॅकी भगनानीने केली अनोखी योगासने चाहते म्हणाले,’कपल गोल’

Bollywood News । नुकताच ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024’ साजरा झाला. या दिवशी सर्वांनीच योगा करत निरोगी आणि उत्तम जीवनशैलीसाठी जनजागृती केली. फिटनेसबाबत जागरुक असलेल्या प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटींनी योग केल्यानंतर त्यांचे फोटो शेअर केले आहे.
अशात आपल्या फिटनेस दिनचर्यासाठी ओळखली जाणारी रकुल प्रीत सिंग अनेकदा तिचे योगा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर जॅकी भगनानीसह स्वत: योगासन करतानाचे फोटो पोस्ट केले आणि दोघांच्या फोटोंनी सर्वांची मनं जिंकली आहेत.
फोटोत, रकुल प्रीत सिंग आणि तिचा पती जॅकी भगनानी अनोखी योगासने करताना दिसत आहेत. रकुलने फोटोही शेअर केले ज्यात ती जॅकीसोबत योगासन करताना दिसत आहे. फोटो दोन वेगवेगळ्या योग सत्रांचे आहेत जे एकत्र पोस्ट केले गेले आहेत. रकुल आणि जॅकीला असे पाहून लोक त्यांचे खूप कौतुक करत आहेत.
रकुल प्रीत सिंगचा योग दिवस सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. रकुलने तिच्या पोस्टला कॅप्शन दिले, ‘आरोग्य एकत्र आणि सर्व सुंदर गोष्टी तुम्हा सर्व प्रिय लोकांना ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024′ च्या शुभेच्छा. आरोग्यासाठी छोटी पावले उचला. योग म्हणजे मनाची अवस्था, आनंदाची अवस्था, एक असण्याची भावना.’ असेही तिने लिहिले आहे.
दरम्यान, रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी यांचे लग्न आयटीसी ग्रँड साउथ गोवा येथे पार पडले. शिल्पा शेट्टी, तिचा पती राज कुंद्रा, वरुण धवन, त्याची पत्नी नताशा दलाल, अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी लग्नाला हजेरी लावली होती.





