Satara | सातारा तालुका पोलिसांचे ‘माहेर’मध्ये रक्षाबंधन

सातारा (प्रतिनिधी) – बहीण भावाच्या पवित्र नात्याचा आनंद द्विगुणीत करणार्या रक्षाबंधनादिवशी सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या प्रेरणेतून कारंडवाडी, ता. सातारा येथील माहेर संस्थेत रक्षाबंधन सोहळा रंगला. या उपक्रमाने तेथील महिला, मुलींना भावाचे प्रेम लाभल्याने त्यांच्या चेहर्यावर आनंद झळकत होता.
रक्षाबंधनादिवशी ज्यांना कोणीच नाही अशा निराधार महिला, मुलींना रक्षाबंधन साजरे करता यावे यासाठी कारंडवाडी येथील माहेर संस्थेतील निराधार महिला, वृद्ध महिला, वेडसर महिला, निराधार मुली यांच्याकडून पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांना राखी बांधण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्यासह सर्व कर्मचार्यांनी माहेरमध्ये झालेल्या कार्यक्रमात राख्या बांधून घेतल्या आणि निराधार महिला, मुलींना भावाचे प्रेमही दिले.
यावेळी पोलीस ठाण्याकडून माहेर संथेतील 60 महिला, मुलींना ओवाळणी म्हणून मिठाई व गिफ्टचे वाटप करण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलीस फौजदार माने, पोलीस हवालदार धोंडीराम हंकारे, धनंजय कुंभार, महेंद्र नारनवर, डोंबाळे, महिला कॉन्स्टेबल वर्षा देशमुख, होमगार्ड नाईक मोटे तसेच अंमलदार उपस्थित होते.





