वृक्षांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे; अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

वाघोली– आव्हाळवाडी तालुका हवेली येथील महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा भाजप उपाध्यक्ष सदस्य गणेश कुटे यांच्या दोन्ही मुली प्राची कुटे आणि श्रुती कुटे गेल्या सात वर्षापासून आपल्या भागातील वृक्षांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे करीत आहेत. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या हेतूने तसेच झाडांचे महत्त्व जाणून वृक्षांना राखी बांधून वृक्षांबद्दलचे बंधुत्व निर्माण करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्राची कुटे हिने सांगितले. या उपक्रमाबद्दल कविता कुटे, अर्चना कुटे, सृष्टी कुटे आदींनी अभिनंदन केले आहे.
…त्यांच्या बद्दल ही राखीतून कृतज्ञता.
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना प्राची कुटे आणि श्रुती कुटे यांनी स्वतः राख्या बनवून त्यांना पाठवल्या आहेत.
“प्राची कुटे आणि श्रुती कुटे यांनी पर्यावरण रक्षणाचे अनोखे रक्षाबंधन साजरे केले आहे. तसेच देशासाठी अविरत सेवा देणाऱ्या राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व भारतीय सैन्य दलातील सैनिकांप्रती जोपासलेली बंधुता कौस्तुकास्पद आहे.” – अविनाश कुटे सदस्य, ग्रामपंचायत आव्हाळवाडी





