बॅालीवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील साई शरण अपार्टमेंन्टमधील घरात घूसून अज्ञात व्यक्तीने चाकू केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. आता सैफला आसीयुमधून नार्मल रुममध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. सैफवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे अनेकांना धक्काच बसला. हल्लेखोर सैफच्या घरात पोहचलाच कसा? तिथे सुरक्षा व्यवस्था नव्हती का? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे राहिले आहेत. यावर आता अभिनेत्री राखी सावंत हिची प्रतिक्रिया समोर आली आहे.
तू एवढा कोट्याधीशी मग
राखी सावंत सध्या दूबईत असून तिने सैफला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अनेक प्रश्न उपस्थित करीत एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. मित्रांनो, मला खूप वाईट वाटतं. मी दुबईत बसले आहे, सध्या मी इथेच राहतेय. ही खूपच धक्कादायक बातमी आहे की, सैफ अली खान-करीना कपूरच्या घरात चोर घुसला. यावर तिने आश्चर्य व्यक्त केले आहे. पुढे राखी म्हणाली, सैफ तू एवढा कोट्याधीस आहेस, मग सीसीटीव्ही कॅमेरे का लावले नाहीस? असा सवाल राखीने सैफला करत सगळीकडे सीसीटीव्ही बसवण्याचा सल्ला दिला.
करीनाची फिकीर कर
माझ्या संघर्षाच्या काळात राकेश रोशन यांच्या सिनेमात सैफ अली खानसोबत एक गाणं केलं होतं. सैफसोबत इतकं वाईट घडेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता, असं राखी म्हणाली. तसेच हे बिल्डिंग वाले काय करतात महिन्याला इतके पैसे घेतात आणि सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावू शकत नाही अशा कडक शब्दांत तिने आपला संताप व्हिडिओ शेअर करीत व्यक्त केला. एक मोठा स्क्रीन बसव. घराच्या बाहेरून कोण आत येत बाहेर जात हे सर्व रेकॅार्ड होत, अरे तू सेलिब्रेटी आहेस, तुला स्वःताची फिकर नसेल तर करीनाची फिकीर कर अस राखी म्हणाली आहे.