Rakesh Roshan Angry : नव्या नवरीला दारातच अडवलं..! राकेश रोशन यांचे तृतीयपंथींशी वाद, VIDEO तुफान व्हायरल

Rakesh Roshan Angry | Transgenders | Video Viral : रोशन कुटुंबातील आनंदाच्या वातावरणात काल एका अनपेक्षित घटनेमुळे मिठाचा खडा पडला. अभिनेता हृतिक रोशनचा चुलत भाऊ ईशान रोशन आणि ऐश्वर्या सिंह यांचा शाही विवाहसोहळा २३ डिसेंबरला मुंबईत उत्साहात पार पडला. मात्र, लग्नानंतर नवीन जोडपे घरी परतत असताना राकेश रोशन आणि तृतीयपंथी यांच्यात झालेला वाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
आनंदाच्या सोहळ्यात वादाची ठिणगी?
ईशान आणि ऐश्वर्या लग्नाचे विधी आटोपून घरी पोहोचले. परंपरेनुसार नवीन सुनेचे स्वागत करण्यासाठी कुटुंब उत्सुक होते. ऐश्वर्या बसमधून उतरत असतानाच तिथे उपस्थित असलेल्या काही तृतीयपंथीयांनी तिचा मार्ग अडवला आणि ‘नेग’ (बक्षीस) मागण्यास सुरुवात केली. सुरुवातीला हे सर्व शुभेच्छा देण्यासाठी सुरू असल्याचे वाटले, पण काही वेळातच त्याचे रूपांतर तीव्र वादात झाले.
राकेश रोशन यांचा संताप :
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक राकेश रोशन अत्यंत संतापलेले दिसत आहेत. तृतीयपंथीयांनी पैशांची मागणी लावून धरल्यामुळे राकेश रोशन यांचा संयम सुटला आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून ते या प्रकारामुळे प्रचंड अस्वस्थ आणि रागात असल्याचे स्पष्ट जाणवत होते.
View this post on Instagram
सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया :
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी राकेश रोशन यांची बाजू घेत या प्रवृत्तीवर कडाडून टीका केली आहे. “हे लोक अभिनंदन करायला नाही, तर हक्काने खंडणी मागायला येतात. हे एका मोठ्या रॅकेटसारखे सुरू आहे,” अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली.
दुसऱ्या एका युजरने संशय व्यक्त केला की, “सेलिब्रिटी कुटुंब आहे म्हणून त्यांनी नक्कीच लाखो रुपयांची मागणी केली असणार. आनंदाच्या प्रसंगी अशी अडवणूक करणे चुकीचे आहे.” अश्या प्रतिक्रिया नेटकरी करत आहेत.
रोशन कुटुंबासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण होता, जिथे हृतिकसह संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते. मात्र, घराच्या दारातच घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सध्या या घटनेची चित्रपटसृष्टीत आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.





