Rajya Sabha Election : मविआकडून राज्यसभेवर कुणाची लागणार वर्णी? शरद पवार कि आणखी कोण?
निवडणूक आयोगाकडून राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुकीची (Rajya Sabha Election) घोषणा करण्यात आली आहे. 37 पैकी 7 जागा महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे या जागांवर कुणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Rajya Sabha Election : निवडणूक आयोगाकडून राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुकीची (Rajya Sabha Election) घोषणा करण्यात आली आहे. 37 पैकी 7 जागा महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे या जागांवर कुणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शरद पवार, रामदास आठवले, फौजिया खान, रजनी पाटील, प्रियांका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्याने निवडणूक (Rajya Sabha Election) आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे.
पक्ष निहाय संख्याबळ
विधानसभेतील सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपकडे 131 आमदार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडे 57 आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 40 आमदार आहेत.त्यामुळे महायुतीकडे तब्बल 228 मते आहेत. तर महाविकास आघाडीकडे शिवसेना उबाठाकडे 20, काँग्रेस 16, राष्ट्रवादी शरद पवार गट 10 आमदार कडे असे 46 मते आहे. राज्यसभेचा मतांचा कोटा 37 होत आहेत. राज्यसभेसाठी प्रत्येक जागेसाठी किमान 37 पहिल्या पसंतीच्या मते आवश्यक असतात. त्यामुळे महायुतीला सहा जागा निश्चित मिळणार असल्याचे संकेत आहेत.
त्यात भाजपला चार, शिवसेनेला एक आणि राष्ट्रवादीला एक जागा मिळू शकते. तरीही भाजप, शिवसेने, राष्ट्रवादीकडे अतिरिक्त मते राहत आहेत. ते मते कोणासाठी वापरले जातात हे महत्त्वाचे आहेत. मविआला एक जागा मिळवण्यासाठी तिन्ही पक्षांची एकजूट आवश्यक असल्याने महाविकास आघाडीची कसोटी पणाला लागणार आहे .
शरद पवार कि आणखी कोण?
महाविकास आघाडीकडून (Rajya Sabha Election) सर्वात जास्त चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याच नावाची आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांनी राज्यसभेत परत येण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र, 85 वर्षीय पवारांची प्रकृती आणि यापूर्वी निवृत्तीचे संकेत दिल्याच्या पार्श्वभूमीवर ते उमेदवारी स्वीकारतील का, याबाबत उत्सुकता आहे.काँग्रेस आणि शिवसेना उद्धव गटातूनही या जागेसाठी दावा केला जात आहे. त्यामुळे आता या जागेवर कुणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
राज्यसभा निवडणूक 2026 कार्यक्रम
सूचना जारी: 26 फेब्रुवारी 2026
अर्ज भरण्याची अंतिम तारीख: 5 मार्च 2026
अर्जांची छाननी: 6 मार्च 2026
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 9 मार्च 2026
मतदान: 16 मार्च 2026 (सकाळी 9.00 ते सायंकाळी 4.00)
मतमोजणी: 16 मार्च 2026, सायंकाळी 5.00






