Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी भाजपची नावं ठरली; रामदास आठवले, विनोद तावडेंसह ‘या’ नेत्यांची नावं आघाडीवर
Rajya Sabha Election : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन यांची भेट घेऊन या नावांची चर्चा करतील.

Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची नावं जवळजवळ निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह 12 प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी रामदास आठवले यांच्यासह अनेक नेत्यांची नावं फायनल करण्यात आली असून ही नावं दिल्लीला पाठवण्यात आली आहेत.
राज्यसभेसाठी विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, प्रितम मुंडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांच्यासह इतर नावांची चर्चा होत आहे. कोअर कमिटीच्या नावांचा प्रस्ताव दिल्लीत चर्चेला जाणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन यांची भेट घेऊन या नावांची चर्चा करतील. त्यानंतर नावांवर शिक्कामोर्तब केला जाईल. २८ फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेची नावे जाहीर केली जाणार आहेत.
रामदास आठवले यांची टर्म संपत आहे. त्यामुळे रामदास आठवले यांना मित्रपक्ष म्हणून भाजपच्या कोट्यातून संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे प्रीतम मुंडे यांच्या जागेवर मागच्या वेळी पंकजा मुंडे या निवडणूक लढल्या होत्या. त्यामुळे प्रीतम मुंडे यांना राज्यसभेची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धैर्यशील पाटील, रावसाहेब दानवे यांचा देखील लोकसभा नि़वडणुकीवेळी पराभव झाला होता. त्यांची नावं देखील राज्यसभेसाठी चर्चेत आहेत. राज्यसभा उमेदवारांची अंतिम निवड करण्यासाठी रविंद्र चव्हाण आता दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेणार असल्याचे समजते. त्यामुळे पुढील एक-दोन दिवसांमध्ये भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. Rajya Sabha Election:
दरम्यान, राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी येत्या 16 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. Rajya Sabha Election:
हेही वाचा:
Amol Mitkari : “दादांचा जीव तुमच्या याच चुकांमुळे गेला”, अमोल मिटकरी DGCA वर आक्रमक






