Raju Shetti : सोलापूर जिल्ह्यात ऊसाला 3500 भाव द्या; राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा
सोलापूर जिल्ह्यात ऊसाला 16 नोव्हेंबरपर्यंत 3500 चा भाव जाहीर करावा, अन्यथा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर एक लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला आहे.

Raju Shetti : सोलापूर जिल्ह्यात ऊसाला 16 नोव्हेंबरपर्यंत 3500 चा भाव जाहीर करावा, अन्यथा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर एक लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला आहे. पंढरपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. शेकडो शेतकरी राजू शेट्टी यांच्या या बैठकीसाठी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊसाला 3100 ते 3150 रुपयांचा दर जाहीर केला आहे. मात्र, हा दर मान्य नसल्याची भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. ऊसाला प्रतिटन 3500 रुपयांचा दर द्यावा, असी मागणी शेट्टी (Raju Shetti) यांनी केली.
16 नोव्हेंबर पर्यंत 3500 चा भाव जाहीर करावा अन्यथा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर एक लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शेट्टी यांनी दिला.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या ऊस तोडी बंद कराव्यात, असे आव्हानही शेट्टी यांनी ऊस उत्पादकांना केले. तसेच, गोकुळमध्ये शासकीय संचालक नेमण्याच्या निर्णयावर सर्व बाजूंनी टीका होत असताना शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांनी हा पोरकटपणा करायची गरज नव्हती, अशा शब्दात टोलेबाजी केली.
लोकशाहीने महायुतीचा पराभव करुन गोकुळमध्ये सत्ता समविचारीला दिली होती. मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीचा हा निर्णय मान्य करणे गरजेचे असताना त्यांच्या 12 संचालकांना त्यांनी फूस लावून बैठकीस जाऊ दिले नव्हते. आता त्यांनी लोकशाहीचा आदर करुन या 12 संचालकांना बैठकीला पाठवून द्यावे, असा टोला देखील त्यांनी (Raju Shetti) लगावला.






