बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला कोण ओळखत नाही. त्याची विनोदी शैली आणि अभिनय दोन्ही अप्रतिम आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैया 2’ मध्येही त्याची पंडित ही भूमिका चांगलीच पसंतीस उतरली होती. मात्र आता तो कायदेशीर अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. या अभिनेत्यावर २० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे, त्यानंतर इंदोर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध नोटीस जारी केली आहे. 15 दिवसांत अभिनेत्याला पोलिसांसमोर हजर व्हावे लागेल, असे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरिंदर सिंग नावाच्या एका बिल्डरने अभिनेता राजपाल यादवविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. आपल्या मुलाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये सपोर्ट करण्यासाठी अभिनेत्याने 20 लाख रुपये कर्ज घेतल्याचे बिल्डरकडून सांगण्यात आले. राजपालाने मुलाला सपोर्ट तर केला नाही शिवाय पैसेही परत दिले नाही.सुरिंदर त्याच्याकडे पैसे मागण्यासाठी गेला तेव्हा राजपाल यादव गायब झाला. त्याने फोन उचलणेही बंद केले. पैसे परत न मिळाल्याने त्रस्त झालेल्या बिल्डरने राजपालवर गुन्हा दाखल केला.
बिल्डरने तुकोगंज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. राजपाल यादव यांना १५ दिवसांत हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.याला राजपालकडून काही उत्तर न आल्यास पोलीस कारवाई करून अटक देखील करू शकतात अशी चर्चा सध्या सुरु आहे.
राजपाल यादववर यापूर्वीही खटला दाखल आहे
ही पहिलीच घटना नाही, जेव्हा पोलिस केसमध्ये राजपाल यादवचे नाव समोर आले आहे. 2010 मध्ये राजपाल यादव एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. त्याचे नाव ‘मिसिंग अॅड्रेस’ असे होते. ते करण्यासाठी त्यांनी एका व्यक्तीकडून 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आणि लवकरच परत देण्याचे आश्वासन दिले. मात्र ही रक्कम देता येत नसल्याने त्या व्यक्तीने न्यायालयात धाव घेतली. तेथे राजपाल यादव 10 कोटी 40 लाखांची रक्कम व्याजासह परत करणार असल्याचे ठरले. न्यायालयाने फटकारल्यानंतरही राजपाल यादवने ते पैसे दिले नाहीत. चेक दिला पण तोही बाऊन्स झाला. यानंतर न्यायालयाने त्याला कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले. मात्र, नंतर त्यांना जामीनही मंजूर झाला.