राजोआनाची फाशीची शिक्षा जन्मठेपेत परावर्तीत करावी – मनिष तिवारींची मागणी
Updated On:

नवी दिल्ली- पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्या हत्याकांडातील फाशीची शिक्षा झालेला आरोपी बलवंतसिंग राजोआनाला फाशी ऐवजी जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी कॉंग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केली आहे. या प्रकरणात बलवंतसिंग राजोआना 26 वर्षांपासून तुरुंगात आहे, त्याची शिक्षा कमी करण्याची आणि त्याची सुटका करण्याची वेळ आली आहे असे मनिष तिवारी यांनी म्हटले आहे.
मंगळवारी, मनिष तिवारी आणि बेअंत सिंग यांचा नातू रवनीत सिंग बिट्टू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी केलेल्या मागणीनुसार राजोआनाच्या सुटकेची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. त्यांचा बदला घेण्याऐवजी त्यांना आता अनुकंपा तत्वावर दया दाखवण्याची गरज आहे असेही मनिष तिवारी यांनी पंतप्रधानांना उद्देशून म्हटले आहे.
टॅग्स:





