Rajnath Singh Malaysia Visit : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दोन दिवसीय मलेशिया दौऱ्यावर
Updated On:

नवी दिल्ली :- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दिनांक 10-11 जुलै रोजी मलेशियाचा दौरा करणार आहेत. द्विपक्षीय संरक्षण सहकार्य दृढ करणे आणि धोरणात्मक भागीदारी अधिक वृद्धींगत करण्यावर दौऱ्यात लक्ष केंद्रित केले जाईल. राजनाथ सिंह, मलेशियाचे संरक्षण मंत्री दातो सेरी मोहम्मद हसन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील.
या दरम्यान उभय देशांमधील संरक्षण सहकार्याचा आढावा घेतला जाईल. या भेटीदरम्यान मलेशियाचे पंतप्रधान वायबी दातो सेरी अन्वर बिन इब्राहिम यांचीही राजनाथ सिंह भेट घेतील.
संपूर्ण प्रदेशात शांतता आणि समृद्धी नांदावी हा भारत आणि मलेशियाचा समान उद्देश्य आहे. दोन्ही देशांमध्ये मजबूत आणि बहुआयामी संबंध आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2015 मधील मलेशिया दौऱ्यादरम्यान धोरणात्मक भागीदारीला चालना मिळाली होती.





