राजकुमार रावचा मालिक चित्रपटात दिसणार ॲक्शन अवतार, चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

Rajkummar rao । स्त्री-२ च्या यशानंतर बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आता एका नव्या चित्रपटात पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे, राजकुमार राव आज आपल्या वाढदिवसाच्या दिवशी मालिक या नवीन चित्रपटाची घोषणा केली.
View this post on Instagram
निर्मात्यांनी एका मनोरंजक टॅगलाइनसह चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. लूक पोस्टरमध्ये, राजकुमार राव कुर्ता-पायजमा घातलेल्या जीपच्या बोनेटवर हातात बंदूक घेऊन उभा असल्याचे पोस्टरवर लिहिले आहे, “तुम्ही जन्मला नाही तर काय बनू शकता.” यासोबत या चित्रपटाचे नाव रिलीज करत चाहत्यांना त्याने स्प्राईज दिल आहे.
राजकुमार रावने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लेटेस्ट पोस्टर शेअर केले आहे. याशिवाय चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहितीही त्याने दिली आहे. या पोस्टला कॅप्शन देत अभिनेत्याने लिहिले, “मालिकच्या जगात तुमचे स्वागत आहे. शूट सुरू झाले आहे. लवकरच भेटू.” या पोस्टनंतर चाहत्यांचा उत्साह चांगलाच वाढला आहे. सोशल मीडियावर पोस्ट पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, राजकुमार रावचा ‘स्त्री 2’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव लवकरच ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्या विरुद्ध तृप्ती डिमरी दिसणार आहे. हा एक रेट्रो ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट 11 ऑक्टोबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
=================





