Pune District : राजगुरुनगरनगर परिषदेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

राजगुरुनगर : राजगुरुनगर नगर परिषदेची अंतिम मतदार यादी आज (दि.31) दुपारी साडेचार वाजता प्रसिद्ध करण्यात आली असून 12,653 महिला,13,147 पुरुष आणि एक तृतीयपंथी मतदार असे एकूण 25,801 मतदार संख्या असल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली.
राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रभाग रचना झाल्यानंतर प्रारूभ मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर त्यावर शहरातील मतदारांनी 2690 हरकती नोंदविल्या होत्या. त्यावर बुधवार (दि.29) रोजी उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या अधिपत्याखाली सुनावन्या झाल्या होत्या. त्यानंतर आज (दि.31) रोजी ऑनलाइन मतदार यादी प्रसिद्ध झाली. दुपारी साडेचार वाजता राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीची अंतिम मतदार यादी नगर परिषदेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली. ती पाहण्यासाठी इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती.
एकूणच राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीला अधिकच रंगत येत असून पुढील आठवड्यात आचार संहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवार घर टू घर प्रचार करीत असून दिवसागणिक या निवडणुकीत रंग भरत आहे. प्रतिक्षा आहे ती केवळ निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची.
प.भागनिहाय मतदार यादी
प्रभाग क्रमांक, पुरुष, स्री, एकूण मतदार, मतदान केंद्र
प्रभाग एक, 1179, 1187, 2366, जिप शाळा स्थिगळस्थळ
प्रभाग दोन, 1348, 1257, 2605, हुतात्मा राजगुरू महाविद्यालय
प्रभाग तीन, 1103, 980, 2083, हुतात्मा राजगुरू महाविद्यालय
प्रभाग चार, 997, 978, 1975, जिप शाळा 1 व 2
प्रभाग पाच, 1285, 1283, 2568, केटीइएस इंग्लिश स्कूल
प्रभाग सहा, 791, 766, 1557, जिप शाळा 1 व 2
प्रभाग सात, 1754, 1645, 3399, महात्मा गांधी विद्यालय
प्रभाग आठ, 1297, 1280, 2577, हुतात्मा राजगुरू विद्यालय
प्रभाग नऊ, 2007, 1856, 3863, शेठ केशरचंद पारख प्रा. शाळा
प्रभाग दहा, 1386, 1421, 2808, केटिइएस इंग्लिश मेडियम स्कूल





