Pune District : जिल्हा बँकेची निवडणूक रांजेद्र कांचन यांनी लढवावी
Pune District : अध्यक्ष राजेंद्र कांचन म्हणाले, "पारदर्शक कारभार, सामाजिक बांधिलकी आणि सभासदांचा दृढ विश्वास या त्रिसूत्रीच्या जोरावर पतसंस्थेने प्रगतीचा चढता आलेख कायम ठेवला आहे.

उरुळी कांचन : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे या बँकेच्या आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव कांचन यांनी केली. येथील ‘डॉ. मणिभाई देसाई नागरी सहकारी पतसंस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी सरपंच ज्ञानोबा (माऊली) कांचन, संतोष कांचन, कोंडीराम चौधरी, उपाध्यक्ष रामदास चौधरी, संचालक शरद वनारसे, भाऊसाहेब कांचन, कांतीलाल चौधरी, संजय कांचन, खेमचंद पुरुसवाणी, संजय टिळेकर, ह.भ.प. जीवन शिंदे, धनसिंग पोंदकुले, अनिकेत कांचन, सारिका काळभोर, कमल कांचन, तज्ज्ञ संचालक प्रवीण दरेकर उपस्थित होते.
अध्यक्ष राजेंद्र कांचन म्हणाले, “पारदर्शक कारभार, सामाजिक बांधिलकी आणि सभासदांचा दृढ विश्वास या त्रिसूत्रीच्या जोरावर पतसंस्थेने प्रगतीचा चढता आलेख कायम ठेवला आहे. संस्थेचा एकूण संमिश्र व्यवसाय तब्बल 641 कोटी 60 लाख रुपयांवर पोहोचला असून, यंदा सर्व 21 हजार 736 सभासदांना 15 टक्के दराने लाभांश वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा केली. 31 मार्चअखेर ठेवी 312 कोटी 15 लाखांवरून वाढून 362 कोटी 24 लाखांवर पोहोचल्या आहेत. संस्थेने 279 कोटी 36 लाख रुपयांचे कर्जवाटप केले असून, गुंतवणूक 127 कोटी 4 लाख रुपये इतकी आहे.
संस्थेला या वर्षात 7 कोटी 11 लाख रुपये ढोबळ नफा आणि 5 कोटी 54 लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना एकूण 2 कोटी 9 लाख रुपयांचे लाभांश वाटप केले जाणार आहे. अहवालाचे वाचन मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण वाल्हेकर यांनी केले. ज्ञानेश्वर कौले, सुनील जगताप, अशोक टिळेकर, अमीन शेख, एल. बी. म्हस्के, गणेश चव्हाण या सभासदांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष रामदास चौधरी यांनी आभार मानले.
१५ टक्के लाभांश
अध्यक्ष राजेंद्र कांचन म्हणाले, “पारदर्शक कारभार, सामाजिक बांधिलकी आणि सभासदांचा दृढ विश्वास या त्रिसूत्रीच्या जोरावर पतसंस्थेने प्रगतीचा चढता आलेख कायम ठेवला आहे. संस्थेचा एकूण संमिश्र व्यवसाय तब्बल 641 कोटी 60 लाख रुपयांवर पोहोचला असून, यंदा सर्व 21 हजार 736 सभासदांना 15 टक्के दराने लाभांश वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
सभासद खंबीर साथ देणार
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी निवडणूक लढवावी, असा ठराव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव कांचन यांनी मांडला. यावेळी उरुळी कांचन गाव आणि पतसंस्थेचे सभासद खंबीरपणे कांचन यांच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या ठरावाला माजी सरपंच संतोष कांचन यांनी अनुमोदन दिले.





