Assam Train Accident | आसाममध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला. सैरांगहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या ‘राजधानी एक्स्प्रेस‘ रेल्वेच्या अपघातात आठ हत्ती ठार, तर एक हत्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघातात इतका भयानक होता की, रेल्वेचे इंजिन आणि पाच डब्बे रुळावरून घसरले. ही घटना आसाममधील होजाई जिल्ह्यातील छंगजुराई भागात मध्यरात्री 2 वाजून 17 मिनिटांच्या सुमारास घडली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्तींचा कळप रेल्वे रुळ ओलांडत असताना रेल्वेला धडक लागली. या धक्क्यामुळे इंजिनसह पाच डबे रेल्वे रुळावरून घसरले. ही घटना गुवाहाटीपासून सुमारे 126 किमी अंतरावर घडली. या अपघातात कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वेचे पाच डब्बे आणि इंजिन रुळावरून उतरल्यामुळे, तसेच हत्तींचे मृतदेह रुळावरच पडलेले असल्यामुळे आसाम आणि पूर्वेकडील राज्यात जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या तुर्तास रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. जे डब्बे रुळावरून घसरले आहेत, ते वेगळे करण्यात आले आहेत. युद्धपातळीवर काम केल्यानंतर हत्तींचे मृतदेह आणि डब्बे रुळावरून हटवण्यात आले आणि त्यानंतर रेल्वे गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाली. Assam Train Accident | हेही वाचा: Unhealthy Eating Habits: घाईघाईत जेवण करणं आरोग्यासाठी धोकादायक; पोटात गॅससह वाढू शकतात गंभीर समस्या