rajayrasabha election । राज्यसभा निवडणूक बिनविरोध,अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद, नेमकं काय कारण?

निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या जागांमध्ये आंध्र प्रदेश (3), बिहार (6), छत्तीसगड (1), गुजरात (4), हरियाणा (1), हिमाचल प्रदेश (1), कर्नाटक (4), मध्य प्रदेश (5), महाराष्ट्र (6), तेलंगणा (3), उत्तर प्रदेश (10), उत्तराखंड (1), पश्चिम बंगाल (5) ओडिशा (3) आणि राजस्थान (3) या 16 राज्यांमधील 56 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
अशात राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणुक होणार आहे. या सहा जागांसाठी सात जणांनी अर्ज केले होते, त्यामधील एका उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाला आहे.
दरम्यान, भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे या तिघांनी अर्ज केले. तर, शिवसेनेकडून मिलिंद देवरा, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे यांनी अर्ज दाखल केले. तर अपक्ष म्हणून विश्वास जगताप यांनी अर्ज भरला होता. मात्र, या निवडणुकांसाठी सूचक, अनुमोदक म्हणून आमदारांच्या सह्या लागतात. त्याची पुर्तता जगताप यांच्याकडून करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज छाननीत बाद करण्यात आलं.
मिळालेलं माहितीनुसार, अपक्ष म्हणून विश्वास जगताप यांनी अर्ज भरला होता. मात्र, या निवडणुकांसाठी सूचक, अनुमोदक म्हणून आमदारांच्या सह्या लागतात. त्याची पुर्तता जगताप यांच्याकडून करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज छाननीत बाद करण्यात आलं.दरम्यान, भाजपच्या तीन आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एक अशा सहा उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्यात जमा आहे. 20 तारखेला अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल.
हेही वाचा
ISRO । इस्रो हवामान उपग्रह प्रक्षेपित करणार, जाणून घ्या ‘नॉटी बॉय’ रॉकेट कसे काम करेल
अजित पवार भावूक होत म्हणाले,’…तर मी विधानसभा निवडणूक लढणार नाही’





